वैजापूर नगरपालिकेतर्फे शहरातील 34 माजी सैनिकांना मालमत्ता करात 100 टक्के सूट

वैजापूर ,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील माजी सैनिक व विधवा पत्नी यांना मालमत्ता करात 100 टक्के सूट देण्याचा निर्णय पालिकेने मंगळवारी सर्वसाधारण सभेत घेतला. या निर्णयाचा पालिका हद्दीतील एकूण 34 माजी सैनिकांना लाभ मिळणार आहे.
शासनाच्या परिपत्रकानूसार निव्वळ मालमत्ता कराच्या 100 टक्के  सूट देण्याची कार्यवाही पूर्ण करून शहरातील एकूण 34 माजी सैनिकांना निव्वळ मालमत्ता करात 100 टक्के  सूट देण्यात आली आहे. 
नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले.  सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. उपनगराध्यक्ष साबेरखान यांच्यासह पालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश चव्हाण, मुख्याधिकारी बी.यु.बिघोत व सर्व नगरसेवक या सभेस उपस्थित होते.