वैजापूर पालिकेचा सन 2022-23 चा 17 कोटी 51 लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

वैजापूर ,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- नगर परिषद वैजापूरचा सन 2022-23 या वर्षीचा 17 कोटी 51 लाख 85 हजार 120 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंगळवारी विशेष सभेत मंजूर करण्यात आला.

पालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा ऑनलाइन (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) झाली.नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायती अधिनियम 1956 चे कलम 101 नुसार हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.या अर्थसंकल्पात शहरातील स्वछता व विकास कामावर भर देण्यात आला आहे. भुयारी गटार योजनेसाठी 100 कोटी रुपयांची तर शहर सफाई कंत्राटसाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

Displaying IMG_20220217_220534.jpg

पालिकेच्या या अर्थसंकल्पीय ऑनलाइन सभेस उपनगराध्यक्ष साबेर खान, नगरसेवक डॉ.दिनेश परदेशी, राज्य राजुसिंग राजपूत, सचिन वाणी, प्रकाश चव्हाण, स्वप्नील जेजुरकर, शैलेश चव्हाण, प्रीती भोपळे,जयश्री राजपूत, दशरथ बनकर, सखाहरी बर्डे, इम्रान कुरेशी, डॉ. निलेश भाटिया, मुमताजबी सौदागर, अनिता तांबे, शेख रियाज, मुख्याधिकारी भागवत बिघोत, लेखापाल बी.एम.चव्हाण आदींनी सहभाग नोंदवला.