जालना जिल्ह्यात 90 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना, दि. 12 :- जालना शहरातील कॉलेज रोड -2,पानीवेस -2,गुडला गल्ली -1,सराफानगर -3,संभाजीनगर -2,कांबळे गल्ली संभाजीनगर -10,माळीपुरा -1, मस्तगड -7,अंबर हॅाटेल परिसर -1, लक्ष्मीनारायणपुरा -1,गांधीचमन -1, दुःखी नगर -1, रहेमान गंज -1,कचेरी रोड -1, भावसार गल्ली -1,शोला चौक -1, समर्थ नगर -1, तुळजाभवानी नगर -2,हकीम मोहल्ला -1, कन्हैयानगर -1, गांधीनगर -8,चौधरीनगर -4,गणेश जिनिंग -1,पानीवेस -1, काद्राबाद- 13, वाल्मिकनगर -1,श्रीनगर -1,नुतन वसाहत -1,तटटुपुरा -1,गोपिकिशननगर -1,खवा मार्केट -2,नया बाजार -1, विनगीपुरा -1, नळगल्ली -1,अखिल मस्जिद जवळील -1,शांकुतल नगर-1, लककडकोट -1,अमीत होटेल परिसर -1, चार्वापुरा -1, पेन्शनपुरा -1,नेहरु रोड -1,उटवद ता. जालना -1, पोस्ट ऑफिस गल्ली जाफ्राबाद -1,मेन रोड बदनापूर -1,पिरगैबवाडी ता.घनसावंगी -1 मंठा -1,अशा एकूण 90 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर क्रांतीनगर -1, नाथबाबा गल्ली -1, शिवनगर -1, रामनगर-1 दानाबाजार -4, बु-हाणनगर-10, मुर्तीवेस -1, अंबड -2 अशा एकूण 21 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण– 5246, असुन सध्या रुग्णालयात -302 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2052, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–317 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-7222 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–90 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1047 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -5819,रिजेक्टेड नमुने -17, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-421 एकुण प्रलंबित नमुने-339,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1711.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–51, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1509, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -51, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -515, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -302,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-104, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-21, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-616, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-363 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-29, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-16541, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 39 एवढी आहे.

जालना शहरातील बरवार गल्ली परिसरातील रहिवासी असलेला 45 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा ञास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 8 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 12 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 10 जुलै 2020रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. तसेच जालना शहरातील वाल्मिकनगर परिसरातील रहिवासी असलेला 59 वर्षीय महिला रुग्णास अस्थमा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 10 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच दिनांक 12 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 12 जुलै 2020रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आजसंस्थाित्मिक अलगीकरणात असलेल्या व्यसक्तींचची संख्याप 515 असून /संस्थाहनिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-03, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना- 00, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 55, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-00, जे ई एस मुलांचे वसतिगृह- 38, जे ई एस मुलींचे वसतिगृह – 38, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 21, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 96, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 116, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 14, मॉडेल स्कुल परतुर – 00, केजीबीव्ही परतुर -16, केजीबीव्ही मंठा -00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -11, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-25,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-13, ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -08,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-12, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन – 7, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-10,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -22, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -9.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -946 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 871 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 55 हजार 830 असा एकुण 6 लाख 82 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *