आयकॉन चषक क्रिकेट स्पर्धेत एबीसी व क्रेडाई उपांत्य फेरीत

आज रंगणार उपांत्य फेरीचे सामने

औरंगाबाद,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या आयकॉन चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी क्रेडाई संघाने गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर संघाचा १८ आणि एबीसी संघाने आयआयए संघावर ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

Displaying Man of Match-2.JPG
एबीसी संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करताना उद्योग संचालक बी.टी.यशवंते, उपसंचालक किरण जाधव, पंकज पांडे 

पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत क्रेडाई संघाने १५ षटकांत ७ बाद १२२ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सुयाेग माछर याने ३२ चेंडूंत ७ चौकारांसह ४७ धावा केल्या. अमित भंडारीने नाबाद १७, राहुल तोबरेने १६, मनोज दरकने १४ आणि समीर सोनवणे याने १० धावा केल्या. गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर संघाकडून कर्णधार मिहिर मुळे याने ३ तर विक्रांत कुलकर्णीने २ व अक्षय ढवळे याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर संघ ६ बाद १०४ धावापर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याडून अभय भोसलेने ३३ चेंडूंत २ चौकार, ३ षटकारांसह ४० धावांची झुंजार खेळी केली. अजय देशमुखने ३१, मिहिर मुळेने १३ धावा केल्या. अखिलने २ तर समीर सोनवणे, राहुल तोबरे, दीपक कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Displaying iCON cUP 2022.png


दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात नितीन करोडीवाल याच्या ३८ चेंडूंतील ५ टोलेजंग षटकार व ६ खणखणीत चौकारांसह फटकावलेल्या ७४ धावांच्या बळावर एबीसीए संघाने १५ षटकांत ६ बाद १८८ धावांचा एव्हरेस्ट रचला. त्याच्याशिवाय शेख कैफने १४ चेंडूंत ३७, सागर कुमावतने २९ व विठ्ठल कुमावतने १८ धावा केल्या. आयआयए संघाकडून अजय राजपूत व मोहमद रझा कुरैशी यांनी प्रत्येकी २ तर दीपक गरकळने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आयआयए संघ ९ बाद ११७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून अजय राजपूतने २५ चेंडूंत ३ षटकार व एका चौकारांसह ४१, देवाशीष जैस्वालने १४ चेंडूंत २८ व दीपक गरकळने ११ धावा केल्या. शेख कैफ, संदीप बारवाल यांनी प्रत्येकी २ तर एन. सय्यद, विठ्ठल कुमावत, विनोद के., नितीन करोडीवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

उपांत्य फेरीचे सामने
आयकॉन चषकातील पहिला उपांत्य फेरीचा सामना गुरुवारी आयकॉन इलाइट आणि क्रेडाई यांच्यात सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये एसीइपी आणि एबीसी हे दोन संघ सकाळी साडेअकरा वाजता आमने-सामने उभे ठाकतील.