इनरव्हील क्लब औरंगाबादकडून कर्करोग निदान व मुखरोग निदान शिबिर

औरंगाबाद,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- कांचनवाडी औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यलय व रुग्णालय आणि  इनरव्हील क्लब, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शास्र विभागाच्या वतीने कर्करोग व मुखरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

Displaying IMG_20220216_181321.jpg

कार्यक्रमाचे उद्धघाटन इनरव्हील क्लब औरंगाबाद अध्यक्ष  लता मुळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख शल्य चिकित्सा  शास्र दिन साजरा करण्यात आला. शिबिराच्या निमित्ताने रुग्णालयात सुरु असलेल्या मौखिक आरोग्य सप्ताहाची सांगता करण्यात आली. या शिबिरात अनेक गरजू आणि गरीब रुग्णांवर उपचार करण्यात आले. यानिमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विजयी विदयार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.                    यावेळी इनरव्हील क्लब औरंगाबाद सचिव  छाया भोयर, पी. डी. सि. उषा धामणे, आशा भांड, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुभाष भोयर व प्रभारी अधिष्ठाता डॉ. लता काळे, मुखशल्य चिकित्सा शास्त्रविभाग प्रमुख डॉ. उमा महिंद्रा, डॉ. दीपक मोटवानी, डॉ.  विश्वास कदम, डॉ. कपिल पवार, डॉ. कुशल शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.