रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्लीतील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिराला दिली भेट

नवी दिल्ली ,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविदास जयंतीनिमित्त दिल्लीतील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिराला भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली.

Image

आपल्या ट्विटरसंदेशांमध्ये  पंतप्रधान म्हणाले;


 “रविदास जयंतीच्या मंगलदिनी आज मी दिल्लीतील श्री गुरु रविदास आराम धाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 


 सर्व देशवासियांना  रविदास जयंतीच्या  शुभेच्छा!

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची आदरांजली

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी, संत श्री रविदास जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ” “संत श्री रविदास जी यांनी  आपल्या विचारांनी आणि रचनांनी समाजात आध्यात्मिक चेतना जागृत करून मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेला  एकता, समानता आणि कर्म प्राधान्यतेचा संदेश नेहमीच आपल्याला  मार्गदर्शक राहील.”


श्री शाह म्हणाले, “संत रविदासजींचे जीवन हे  प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि न्याय देऊन समाजाला एकत्र आणण्यासाठी समर्पित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील  केंद्र सरकार,संत रविदासजी यांनी दिलेल्या विचारांच्या  जाणिवेतून  प्रत्येक घटकाला विकासात भागीदार करून त्यांचे  जीवनमान उंचावण्यासाठी, सतत कार्यरत आहे.”