दहा रुपयाची नाणी,वैध व चलनात

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश

औरंगाबाद,१५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  10 रुपंयाची सर्व नाणी वैध असून समाजात पसरलेल्या अफवा गैरसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात, ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी 10 रुपंयाची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात, नागरिकांना याविषयी स्पष्टता नसल्याने त्यांच्याकडे 10 रुपंयाची नोट देण्याशिवाय अन्य पर्याय उरत नाही. तसेच त्यांच्याकडे केवळ नाणी असल्यास त्यांच्या खरेदी करण्यावर बंधने येतात आणि त्यांची गैरसोय होते. यामुळे भारतीय रिझर्व बँकेच्या 17 जानेवारी 2018 च्या निर्देशानुसार नाणी स्विकारण्याच्या संदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

प्रत्यक्षात, 10 रुपयांची नाणी स्विकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, असे निर्देशही भारतीय रिझर्व बँकेने दिले आहेत. या प्रसिद्ध पत्रकाद्वारे पोलीस ठाण्यात तक्रार करुन संबंधित दुकानदार, विक्रेते यांच्या विरुद्ध तक्रार केल्यास शिक्षेचे प्रावधानही आहे. तसेच भारतीय रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार 10 रुपयांची सर्व नाणी सर्व बँकाना स्विकारणे व वितरीत करणे बंधनकारक आहे.