शिवजागराने शिवजयंती साजरी केली जाणार

औरंगाबाद,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भारतातील सर्वात उंच असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रांतीचौकात  स्थापन झाला असून तो आनंद व शिवजयंती या निमित्ताने दिनांक 15,16, 17 व 18 फेब्रुवारी रोजी ‘शिवजागर’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे,आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट ,महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर त्र्यंबक तुपे,उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, नितीन घोगरे यांनी सांगितले.

शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई,चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या उत्सवास ध्वजारोहणाने 15 फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात सुरुवात होणार असून 15,16,17 रोजी औरंगाबाद शहरातून तब्बल 36 शिवमशाल एका रथावरून क्रांतीचौकात पोहोचणार आहेत. या शिवमशाली यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे सर्व उपशहर प्रमुख करतील ,त्याचप्रमाणे महिला आघाडी, दलित आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, वाहतूक आघाडी ,व्यापारी आघाडी स्वतंत्रपणे शिवमशाल यात्रा काढणार आहेत. दररोज सकाळी 10 आणि सायंकाळी 4 वा. शहरातील नावाजलेले वाद्यवृंद मानवंदना देणार आहे. रोज सायंकाळी 4.00 वा महाअभिषेक आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले असून यात शहरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा होणार असून 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी युवा शाहीर गणेश गलांडे आपली शाहीरी गाजवणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध शिवचरित्राचे अभ्यासक प्रदीप दादा साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे तसेच दि.18 तारखेला सकाळी 10.00 वा मानवंदना व रात्री 09.00 ते 12.00 वाजेपर्यंत 1000 तरुण तरुणींचे पथक महामानवंदना देणार आहे . तसेच दररोजच्या कार्यक्रमाचा समारोप साडेतीन पीठ देवींच्या आरतीने होऊन  आतिषबाजी केली जाणार आहे.

या उत्सवात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, जयवंत ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य ,गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनिता देव, समन्वयक कला ओझा, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.