मणिपूरात शिवसेना खाते उघडेल – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये
मणिपूर राज्यात विद्यमान भाजप आमदार व माजी मुख्यमंत्री यांच्या मुलाने घेतला शिवसेनेत प्रवेश
इंफाळ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मणिपूर राज्यात विद्यमान भाजप आमदार व माजी मुख्यमंत्री यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. मणिपूरा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
काँग्रेसचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत राजकुमार दोरेद्रसिं यांचे चिरंजीव आर. के. सुरजसिंग यांनी शिवबंधन बांधले.तर भाजपचे दोनवेळा आमदार राहिलेले थांगझलम हाओकीप व असेम बाबुसिंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुखमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी इंफाळ येथे गावागावात भेटी देऊन शिवसेनेला ९ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी उमेदवार कोनसा मिशेल, महिला आघाडीच्या मनोरमा देवी, उपजिल्हाप्रमुख विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर आदी उपस्थित होते.