वैजापूर शहरवासीयांतर्फे लता दिदींना व्हिडीओ गीतातून भावपूर्ण श्रद्धांजली

वैजापूर ,१४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांना रविवार सायंकाळी वैजापूरवासीयांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. सायंकाळी सात ते दहा या दरम्यान दिदींच्या मधुर व गोड आवाजातील व्हिडीओ चित्रपट गाणी ऐकून त्यांना शहरातील नागरिकांनी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. 

Displaying IMG-20220213-WA0131.jpg

शिवसेना वैजापूर व जे.के.जाधव मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वसंत क्लबच्या मैदानावर आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमास आ.रमेश पाटील बोरणारे, ,माजी नगराध्यक्ष साबेरखान ,माजी उद्योग संचालक जे.के.जाधव, मेजर सुभाष संचेती, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, नगरसेवक प्रकाश चव्हाण, अमोल बोरनारे, सीमा देशमुख, योगिता राजपूत, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.व्ही.एन.ढाकरे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, खुशालसिंह राजपूत, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, सलीम वैजापूरी, मनाजी पाटील मिसाळ, गोपालदास आसर, भगवानसिंग राजपूत, बळीराम राजपूत, प्राचार्य भिंगारदेव, दिपक बरकासे, मकरंद कुलकर्णी, बाबासाहेब धुमाळ, राजू केदार, रवींद्रअप्पा साखरे, वैजीनाथ मिटकरी, अशोक धसे, उपप्राचार्य कोतकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी  श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचलन व आभार धोंडीरामसिंह राजपूत यांनी मानले.