सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज – माजीमंत्री डॉ. जयदत्त क्षीरसागर

तेली समाजाच्या वधूवर व पालक परिचय मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

औरंगाबाद,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- आजच्या ऑनलाईनच्या दुनियेत प्रत्यक्ष भेटीगाठी कमी होत आहे. अनेकदा ऑनलाईनच्या संकेतस्थळांवरून व माध्यमातून फसवणूक व बदनामी झाल्याचे उदाहरणे समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाने आपल्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह हि पवित्र पद्धतीचे पावित्र्य जपले आहे. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात सामदायिक विवाहसोहळे आणि वधूवर  व पालक परिचय मेळावे काळाची गरज आहे. यामुळे विश्वासर्हता वाढत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय तैलीक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजीमंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर यांनी केले.

May be an image of 6 people, people standing and indoor

प्रदेश तैलिक महासभा महाराष्ट्र राज्य आयोजित औरंगाबाद जिल्हा तेली समाज बांधवाच्या वतीने राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवारी श्रीहरी पॅव्हेलियन येथे आयोजन केले होते. या मोफत मेळाव्यासाठी राज्यभरातुन मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळला असुन या मेळाव्यासाठी जवळपास ११४७ वधुवरांची नोंदणी झाली आहे.

विशेष म्हणजे या मेळाव्यात डॉक्टर, अभियंता, वकिल, व्यावसायिक आणि शेतकरीवर्गांनी उपस्थिती लावली. तसेच विधवा विधुर, घटस्फोटित, अंध-अपंग या वधुवरांचा पण परिचय केल्याने समाजातील  सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला. या मेळाव्याप्रसंगी शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे यांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत उपस्थित भावी वधूवरांना शुभेच्छा दिल्या.

May be an image of 5 people and people standing

  जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, महाराष्ट्र तैलीक महासभाचे अध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिवाजी चौथे, महिला समितीच्या प्रिया मेहंदळे, बाबुराव महाराज, माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक सचिन खैरै, अनिल मकरिये, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मनोज संतान्से, जिल्हाध्यक्ष सुरेश कर्डीले, सेवा आघाडीचे कचरू वेळंजकर, सुरेश मिटकर, विष्णुशेठ सिदलंबे,  दिपक राऊत, नारायण दळवे, साई शेलार, शिवा महाले,  सोमनाथ सुरडकर, योगेश मिसाळ, राजेश शिंदे, गजानन क्षिरसागर, उमेश रायते, सुनिल लोखंडे, नितीन मिसाळ, उमाकांत चौथे, रमेश बागले गणेश वाघलव्हाळे, अशोक राऊत, आंबदास देवराये, उमाकांत चौथे, युवक आघाडीचे बद्रीनाथ ठोंबरे, गणेश वाघ, महिला समितीच्या दामिनी महाले, अलका शिंदे, नीलिमा आंबेकर, कविता सुरडकर, रंजना वेळजकर आदींनी परिश्रम घेतले.