व्हॅलेंटाईन डे: दुरावा नकोच रे ….पुन्हा

Valentine's Day Love | Spotify Playlist

जय नुकताच एम.सी.ए पूर्ण करून एका मोठ्या कंपनीमध्ये ज्युनिअर इंजिनीअर पदी भल्यामोठ्या पॅकेजवर नोकरी मिळाला. सोलापूर गाव सोडून तो हिरवीगार झाडे, उंच इमारत, स्वच्छ आणि सुंदर  मेट्रो सिटी बेंगलोर मध्ये  रमून गेला. इकडे आईवडील त्यांच्या साठी मुलगी बघायला सुरू केले. अजयला एक ही मुलगी पसंत पडत नव्हती. लग्नाला होकार द्यावा अशी  कुठलीच मुलगी व त्या मुलीचे विचार समन्वय कधी होतच नव्हतं.

 एके दिवशी ऑफिस वरून घरी येत असताना रागिनीला तो पहिल्यांदा बघितला…तिचा रंग सावळा….उजळ नाही आणि जास्त डार्कही नाही. पण चेहर्‍यावर एक तेज आणि डोळ्यांत थोडासा बालिशपणा.

 रागिनीचा पर्स चोरी करून पळून जाणाऱ्या मुलाचा ती पळत पाठलाग करत होती… रस्त्यावर हजारो लोक बघत होते पण कोणीच मदत करत नव्हते….अजयने चोराला त्याच्या बाईक वर जाऊन पकडलं आणि त्याला पोलिस स्टेशनला घेऊन गेला… पहिल्यांदाच रागिनी त्याला म्हणाली तुम्ही देवासारखे पळून आला माझ्या मदतीला थँक्स…!!!

 अजयच्या तोंडातून एकचं शब्द निघालं तू किती सुंदर आहेस..!!! रागिनी त्याच्याकडे स्मितहास्य करून त्याच्या शब्दाला उत्तर दिली. 

रागिनी पळून दमली होती अजय ने तिला  पाण्याची बॉटल  दिला  व समोरच्या सुरभी हॉटेल मध्ये  चहा पिण्यासाठी आग्रह केला.  यावेळी रागिनी  म्हणाली एका कंपनी मध्ये प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत आहे …  आणि तू…. एकमेकांची विचारांची देवाण-घेवाण चालू होती… असेच थोडे दिवस गेले… त्यांच्यामध्ये हळूहळू  जवळीक वाढली ते आठवड्यातून दोन-तीन वेळासंध्याकाळी भेटू लागले.

या दरम्यान जवळपास पाच महिने उलटले मात्र इकडे अजयचे घरचे वैतागले होते. अजय कुठलीच मुलगी पसंत करत नाही… या मुलाचा काय होणार या विचाराने  ग्रस्त होते. दोघे एकत्र असतानाच अजयचा आईचा फोन आला आईने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत अजय रडकुंडीला आला होता …हे  रागिणीला पाहवत नव्हतं… शेवटी रागिनीने विचारलं काय प्रॉब्लेम आहे…अजय यावेळी म्हणाला  मी गरीब कुटुंबात जन्मलो लहानपणापासूनच  गरीबी, दुःख  हे बघत वाढलोय… गरीबीमुळे आई-वडिलांची भांडण…. दोघांमधलं प्रेम कमी होताना बघत आलोय… त्यामुळे  मी आता तरी लग्न करण्यासाठी इच्छुक नाही आहे… मला आई-वडिलांसारखंच भांडण करत बसायचं नाहीये…. हे सांगत असताना अजय मागील वीस वर्षांमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी तिच्याशी शेअर करत होता…. 

 बोलता बोलता रागिनी म्हणाले तुझं चुकतंय तू आईने सांगितलेल्या मुलीशी होकार द्यायला पाहिजे यावेळी रागाच्या भरात अजय व रागिनी मध्ये वाद झाला… रागाच्या भरात तू निघून गेला… रात्रभर झोपू शकला नाही त्यांनी विचित्रपणे रागिनीशी  भांडण केल्याबद्दल विचार करत होता.. रात्रीचे तीन वाजले होते…त्याला चंद्रा कडे पाहत असताना त्याला रागिणी चेहरा त्या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये दिसू लागला.. आणि थोड्या काळासाठी का होईना अजय सुखावला…!! रागिणी आणि त्यांनी  एकदा एकत्र असताना रागिनी ने म्हणलेले शब्द त्याला आठवू लागले हे ही दिवस जातील व सुखाचे क्षण येतील फक्त  स्वतःच्या आयुष्यात योग्य वेळी निर्णय घ्यायला जमलं पाहिजे… पहाटेचे पाच वाजले होते. अजयला सगळीकडे रागिनी दिसत होती…त्याला  भास आहे का  ती इथे आहे… कळतच नव्हतं.  मनोमनी रागिनी ला प्रियसी बनवावं असे विचार करू लागला..अवघ्या चार-पाच दिवसांनी व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे हे बघून तो थोडा सुखावला आणि मनातल्या मनात म्हणाला व्हॅलेंटाईनडे ला मनातील भावना होंडा सांगाव  व आयुष्यभर तिच्यासोबत जीवन जगावं या विचारात तो झोपी गेला….

 ठरल्याप्रमाणे 14 फेब्रुवारीला सकाळी अजयने रागिनी ला संध्याकाळी सुरभी हॉटेल मध्ये सात वाजता भेटण्यासाठी विचारला असता रागिनी होकार दिली…संध्याकाळचे सातला ५ मिनिटे कमी असताना रागिनी कशी काय आली नाही म्हणून अजय बेचैन झाला…घड्याळाच्या काट्या मध्ये सात वाचले आणि लांबूनच रागिनी येताना अजयला दिसली आणि तो  सुखावला….  

रागिनी म्हणाली काय झालं… काय प्रॉब्लेम आहे का??  यावेळी अजय मात्र तिच्या डोळ्यात बघतच राहिला… यावेळी रागिणीला मात्र काही चुकल्यासारखं वाटत होतं… पण त्यालाही कळत नव्हतं की कुठून सुरुवात करू… काय बोलू… रागिनी मात्र बिनधास्त होती… ती मात्र त्याला म्हणाली…!! अरे काय झालं.. असं का बघतोय काय माझ्या चेहऱ्यावर काय लागलंय का?…

अजय वेगळ्या पद्धतीने प्रपोज करायचं ठरवला होता.. अजयने रागिनी साठी डेलचा लॅपटॉप गिफ्ट दिला… वाव..!! किती सुंदर आहे… असे म्हणत.. रागिनी लॅपटॉप सुरुवात केली… लॅपटॉप च्या वॉलपेपर वर ‘तू माझी प्रियसी होशील का?’ तुझाच अजय… असा मजकूर असलेला वॉलपेपर बघून रागिनी आनंदाने अजयला होकार दिली….!!  अजय घरी जाताना म्हणाला आईने दोन दिवसांची मुदत दिली आहे…या चार मुलीपैकी एका मुलीला होकार दे.. हे ऐकून रागिनी शांत झाली.

  अजय म्हणाला मला आता लग्न नाही करायचं….!! लग्न म्हणजे एक सोनेरी पिंजरा वाटतोय.. त्यात अडकले की माझं भविष्य अंधारातच आहे … मला फार मोठा व्हायचं आहे.. या कंपनीत चांगलं नाव, पैसे  कमवायचा आहे… अजून पाच वर्षांनी लग्न करावं असं मला वाटत…आता माझा एवढा वय नाही आहे की, मी लग्न करून जबाबदारी सांभाळावं….!!  या अजयच्या बोलण्याला रागिनी काहीचं बोलू शकली नाही. हे विचार रागिनीला पटलं नाही… 

पण रागिनी काय मदत करु शकते किंवा कशा पद्धतीने  अजयला त्याच्या विचारात बदल करू शकते यासाठी ती विचार करत होती….

 पण या दरम्यानच दोघांमध्ये  जवळीकता वाढली…. अजय रागिनीला  लिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहण्यासाठी तिला विचारलं. क्षणात रागिणीला काही समजतच नाहीये… 

 रागिनी २ दिवसाची मुदत मागितली व विचार करून सांगते असे सांगून ती कामावर गेली. कामावर रागिणीचा लक्षचं लागलं नाही ती  अजयच्या सुखासाठी लिव्ह इन रिलेशनशिप साठी विचार करत होती…. शेवटी 11 मार्च रोजी ते दोघे बेंगलोर  व्हीआयपी रोडला टू बीएचके फ्लॅट भाड्याने घेऊन राहायला लागले.घरकाम करण्यासाठी राणीला कामाला ठेवले तिला महिना  पगार बारा हजार रुपये देत होते.  

  दोघेही फार आनंदी व सुखाचे आयुष्य जगत असताना प्रत्येक क्षण साठवून ठेवत होते आणि बघता बघता चार महिने कसे निघून गेले त्यांना कळलेच नाही.  एक दिवशी अचानक रागिनी आजारी पडली तिला हॉस्पिटल ला ॲडमिट करावं लागलं… अजय रागिनी ला फक्त संध्याकाळी भेटायला जायचा… दिवसभर  हॉस्पिटलमध्ये घरकाम करणारी राणी असायची … तो मात्र ऑफिसला जायचा.. रागिनीला  हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून बारा दिवस झाले होते….संध्याकाळी अजय जेव्हा आला त्यावेळी रागिनी त्याला म्हणाली दुरावा नकोच रे ….तुझा सहवास व सोबत हवाय मला सुट्टी.. घे ना माझ्यासाठी तू माझ्यासोबत राहा मी लवकरच बरं  होईन…..!! पण अजय मात्र ऐकून घ्यायला तयार नाही माझ्याकडे मोठा प्रोजेक्ट आलाय मी हेड असल्यामुळे मला सुट्टी मिळत नाही तू लवकर बरी हो आपण कुठेतरी फिरायला जाऊ….. तिला जाणवायला लागलं की अजयला माझ्यासोबत वेळ घालायला वेळच मिळत नाहीये….. तो रागिनीचा काळजी घेत नव्हता… रागिनी दुखावली होती. मात्र यावेळी रागिनी वेगळ्याच विचारात होती पुढील चार-पाच दिवसात तिची विचार विकोपाला गेले….. रागिनी स्वतच हॉस्पिटलचे बिल भरून  व राणीचे पगार देऊन ती अजयला न सांगता तिच्या गावी गेली….!! 

अजय नेहमीप्रमाणे संध्याकाळी रागिनी ला भेटायला हॉस्पिटल ला गेला… तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिला डिस्चार्ज दिला आहे…अजय फ्लॅट वरून बघतोय तर रागिनी नव्हती  व राणीही  नव्हती…!!  अजय ने फोन केला तेव्हा रागिनी फोन उचलतच नव्हती… जवळपास सात दिवस अजय रागिनी ला फोन करत होता… पण रागिनी फोनचा  आणि एसएमएस चा उत्तर दिलीच नाही…. दिवस कसे गेले कळलेच नाही  रागिनी मीना अजय 14 दिवस फ्लॅटवर एकटाच राहत होता…. तो हळूहळू चिडचिड करू लागला… उदासीनता वाढू लागली… त्याला रागिनीचा विरह सहन होईना…. तो तिला भेटण्यासाठी व्याकूळ झाला होता…!!

 तिकडे मात्र रागिनी खणखणीत बरी झाली होती… तिची वडिलांनी त्यांच्या नात्यातच रागिनी साठी एक मुलगा बघितले… तोही  मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर होता… भरगच्च पॅकेज होता… आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता… बेंगलोर मध्ये स्वतःचा स्वतंत्र बंगला होतं… पण रागिणी मात्र वेगळ्याच विचारात होती तिला अजय सोबत लग्न करायचं होतं पण अजयचा स्वभाव, विचार, वागणं, लग्न नको त्याचे हे विचार…. रागिनी ला काय करू काय नाही असं वाटू लागलं….इकडे अजय तिच्या विरहात आजारी पडला. व्यसनाच्या आहारी गेला,  रागिनीच्या नावाने बडबडू लागला… तो पंधरा दिवस कंपनीला न गेल्यामुळे कंपनीमधून रागिनीला फोन आला….तेव्हा तिला काही कळालच नाही.  अजय कंपनीला का गेला नाही…

 रागिनी दिवसभरात अजयला पन्नास एक फोन केली होती… पण अजय मात्र एकही फोन उचलला नव्हता… रात्रभर रागिनीला अजय सोबत मी चांगला वागला नाही, मी फार वाईट वागले असे स्वतःला दोष देत होती… सकाळी उठून पहिल्या बसने ती  अजय ला भेटण्यासाठी बेंगलोरला आली… ती  फ्लॅटवर येइपर्यंत.. ती स्वतःच्या मनात एक शब्द म्हणत होती…दुरावा नकोच रे ….पुन्हा…. 

 सकाळचे ९.१५ वाजले होते रागिनी फ्लॅट वर पोहचली …रूम आतून लॉक असल्याने स्वतः जवळची चावीने कुलूप उघडून ती घरात गेली….बघते तर काय अजय ने स्वतःला दोष देत दोन्ही हाताचे नसे कापून घेतला होता.. रक्ताच्या थारोळ्यात…. बेशुद्ध पडला होता….  अजयला न सांगता गावाला गेल्यामुळे, रागीनीचा विरह सहन न झाल्यामुळे अजयने हा पाऊल उचलला आणि ह्याला मी दोषी आहे …. हे विचार करत रागिनी सुद्धा आपल्या दोन्ही हाताचे नसे कापून अजयचा डोळ्याकडे बघत ती ही बेशुद्ध पडली….!! राणी एक महिन्यासाठी आपल्या भावाच्या लग्नासाठी गावाला गेली होती …ती सकाळी १० वाजता फ्लॅटवर पोहोचली… अजयला व रागिनी ला बघून घाबरुन गेली… ती पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं….  पोलिसांनी  त्या दोघांना बेंगलोर येथील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केलं….. दोन तासात…दोघेही शुद्धीवर आले… दोघेही आपापल्या चुका मान्य केले…. दोघेही आपल्या घरच्यांना सांगून …. 24 एप्रिल रोजी कोर्टमध्ये विवाह बंधनात अडकले. 

प्रा. अरविंद बगले, सोलापूर