मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी जन अभियान – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  मराठी भाषा दिनापूर्वी (२७ फेब्रुवारी) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी जनरेटा लावून धरण्याचे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले.

Image

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत. नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात शांतता ‘मराठीचे कोर्ट चालु आहे’ हा लघुपट दाखविला, त्याचप्रमाणे प्राचिन पुरावे सांगणारे प्रदर्शन भरविण्यात आले. महामहिम राष्ट्रपतींना  यासंदर्भात सुमारे २५ हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन असून त्यापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी साहित्यिक रंगनाथ पठारे, भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

अभिजात भाषा जनअभियान

● मराठी भाषेला “अभिजात भाषेचा” दर्जा मिळावा यासाठी जनअभियान

● ज्ञानभाषा, राजभाषा, लोकभाषा, प्राचिनता आदि “अभिजात” दर्जासाठीच्या सर्व निकषांवर मराठी भाषा पात्र
● तसा अहवाल “ रंगनाथ पठारे समिती ” कडून केंद्र सरकारला १२.७.२०१३ रोजी सादर
● फेब्रुवारी २०२० मध्ये साहित्य अकादमीच्या तज्ज्ञ समितीमध्ये चर्चा
● राज्याचे मुख्यमंत्री माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली.
● ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यसभेमध्ये मा.अर्जुनराम मेघवाल,मंत्री (संसदीय कार्य, संस्कृती) केंद्र शासन यांनी अभिजात भाषा दर्जा देण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल अशी घोषणा.
● मराठी भाषिकांनी हे जाणून घेणे व या बहुमानासाठी आग्रही असणे आवश्यक
● डिसेंबर २०२१ पासून साहित्य संमेलन नाशिक येथे विभागाने अभिजात मराठी या विषयावर निर्मित केलेला लघुपट, “शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे” आणि प्रदर्शन मांडण्यात आले.
● मराठीप्रेमी जनतेच्या स्वाक्ष-या असलेली सुमारे शेकडो पोस्टकार्डे राष्ट्रपतींकडे रवाना झाली. त्याखेरिज इंटरनेटद्वारेही असंख्य संदेश जात आहेत.
● आता “जनभियान” सुरू केले जात आहे. ज्यात विविध माध्यमातून संदेश देण्यात येत आहे.
● दूरचित्रवाणी, वृत्तवाहिन्या, रेडिओ, इंटरनेट, समाज माध्यमे (सोशल मीडिया), SMS अशा सर्व माध्यमांचा वापर केला जात आहे.
● नामवंतांचा आणि सर्वसामान्यांचा सहभाग
● २७ फेब्रुवारी २०२२ (मराठी भाषा गौरव दिन) रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळावा अशी आग्रहाची मागणी सर्व स्तरांवरुन होत आहे.