श्री जागृत हनुमान मूर्तीच्या तेजोत्तारण विधीस प्रारंभ

व्यास परिवारातर्फे सप्ताहभर धार्मिक कार्यक्रम
औरंगाबाद,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- पानदरीबा येथे श्री जागृत हनुमान मूर्तीच्या तेजोत्तारण विधी व पुनर्प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास गुरुवार, १० पासून प्रारंभ झाला. १६ फेब्रुवारीपर्यंत व्यास परिवारातर्फे सप्ताहभर धार्मिक कार्यक्रमांचे, महाप्रसाद आदींचे आयोजन केले आहे.

या सोहळ्यादरम्यान कैलास वर्मा यांच्या वाणीतून सुंदरकांड होणार आहेत. तर शुक्रवारी हनुमान चालीसा पाठ, शनिवारी पंचमुखीस्तोत्र पाठ, माऊली सत्संग मंडळातर्फे भजनसंध्या, रविवारी श्री जागृत हनुमान जपानुष्ठान, सोमवार, १४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात होईल. तसेच तेजार्पण सोहळ्यानंतर प्राणप्रतिष्ठा सांगता होईल. सायंकाळी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मनोज महाराज गौड यांच्या वाणीतून सुंदरकांड होईल.मंगळवारी मूर्तीस शेंदूर लावून स्तोत्रपाठ आरती व प्रसाद होईल.बुधवार १६ फेब्रुवारी रोजी श्री जागृत हनुमान मूर्तीस लघुरुद्र अभिषेक, महाआरतीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री जागृत हनुमान मंदिराचे सतीश व्यास, मिथुन व्यास, दीपक व्यास, पप्पु व्यास, रितेश व्यास आदींनी केले आहे.