भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 171 कोटी 28 लाखांहून अधिक मात्रा

नवी दिल्ली,१० फेब्रुवारी / प्रतिनिधी :- गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 46 लाख 44 हजारांहून अधिक  (46,44,382) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 171 कोटी 28 लाखांचा (1,71,28,19,947)   टप्पा ओलांडला आहे.
देशभरात 1,91,17,879 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 1,67,882  रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,11,80,751 झाली आहे.परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 96.95% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 67,084 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 7,90,789 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.86% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,11,321 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 74 कोटी 61 लाखांहून अधिक (74,61,96,071) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
 
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.58% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.44%.इतका आहे.

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 171 कोटी 28 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 7,90,789

सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 1.86% इतके आहे
 
रोगमुक्ती दर सध्या 96.95%
 
गेल्या 24 तासांत 1,67,882 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 4,11,80,751 झाली आहे
 
गेल्या 24 तासांत 67,084 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
 
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (4.44%)
 
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (6.58%)
 
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 74 कोटी 61 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 15,11,321 चाचण्या करण्यात आल्या