बीड शहर आणि तालुक्यातील काही ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित, अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू

बीड, दि, 11:- -बीड शहरातील तुळजाई नगर, शाहूनगर, संत तुकाराम नगर आणि बीड तालुक्यातील चौसाळा गावात कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळेे येथील काही भागात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत

.याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत तुळजाई नगर येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने बाळकृष्‍ण गणपतराव थोरात(सरस्वती निवास) यांच्या घरापासून ते गोविंद उत्तम हंगे (तुळजाई निवास )यांच्या घरापर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले आहे

शाहूनगर येथील अश्विनी हॉटेल (गाडे पाटील )ते विष्णू दयाराम जाधव यांच्या साईप्रसाद भोजनालय या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले आहे तसेच संत तुकाराम नगर येथील सुभाष बाबुराव वाघ यांचा रिकामा भूखंड पासून सुभाष गोपाळराव आधापुरे यांचे घर या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले आहे आणि बीड तालुक्यातील चौसाळा येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव निघाल्याने या गावात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले आहे.तसेच हा सर्व भाग पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *