तेली समाजाचा मोफत राज्यस्तरीय वधू -वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा

प्रदेश तैलिक महासभेचा १९ वर्षांपासून सामजिक उपक्रम

औरंगाबाद,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- प्रदेश तैलिक महासभा महाराष्ट्र राज्य आयोजित औरंगाबाद जिल्हा तेली समाज बांधवाच्या वतीने राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. येत्या १३ फेब्रुवारी २०२२ रविवारी सकाळी ९ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत श्रीहरी ९ पॅव्हेलियन शाहनुरमियाँ दर्गा चौक औरंगाबाद येथे हा सोहळा होणार आहे.

हा मेळावा पुर्णपणे मोफत असुन या मेळाव्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी फी नाही. ज्या पालकांनी आपल्या मुलामुलींचे नाव या मेळाव्यासाठी नोंदणी केले त्यांना वधुवर पुस्तीका पण मोफत दिली जाणार आहे. या मोफत मेळाव्यासाठी राज्यभरातुन मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळला असुन या मेळाव्यासाठी जवळ पास ११४७ वधु वरांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात विधवा विधुर, घटस्फोटित, अंध-अपंग यांचाही व वेळेवर आलेल्या वधु वरांचा पण परिचय करून घेतला जाणार आहे.तसेच ज्या वधुवरांचे लग्न या परिचय मेळाव्यात जमतील व मेळाव्याच्या अगोदर जमलेले असेल अशा समाजबांवाच्या कुटुंबाची इच्छा असेल तर कुठल्याही प्रकारची फिस न घेता अयोजन समीती तर्फे या ठिकाणी लग्न लावण्यात येईल. व वधू वरांना एक संपुर्ण पोषाक बुट. चप्पल मणी मंगलसूत्र व संसारोपयोगी वस्तूसाठी रोख ११००० अकरा हजार रू. देण्यात येणार आहे. तरी विवाह इछुक वधूवरांनी त्यांच्या पालकांनी व समाजबांधवांनी आपल्या मुला मुलींची सामुदायिक विवाहासाठी नोंदणी करावी.

या मेळाव्या प्रसंगी अखिल भारतीय तैलीक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षिरसागर, माजी मंत्री चंद्रशेखर बावानकुळे, शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, आमदार प्रदिप जैस्वाल, आमदार संजय सिरसाट, महाराष्ट्र तैलीक महासभाचे अध्यक्ष विजय चौधरी, महाराष्ट्र तैलीक महासभा महिला अध्यक्ष संध्या सव्वालाखे आदीची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

मेळाव्यासाठी समाज बांधव, सर्व तालुका अध्यक्ष महिला मंडळ, सेवाभावी मंडळे, सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तरी समाज बांधवांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संखेने उपस्थि राहवे असे आवाहन आयोजन समितीतर्फे सुरेश कर्डीले, मनोज संतान्से, सुरेश मिटकर, विष्णुशेठ सिदलंबे, कचरू वेळंजकर, दिपक राऊत, नारायण दळवे, साई शेलार, शिवा महाले, योगेश मिसाळ, राजेश शिंदे, सुनिल लोखंडे, सोमनाथ सुरडकर, नितीन मिसाळ, उमाकांत चौथे, रमेश बागले गणेश वाघलव्हाळे,  अशोक राऊत, आंबदास देवराये, उमाकांत चौथे, गणेश वाघ, महिला समितीच्या दामिनी महाले,  अलका शिंदे, नीलिमा आंबेकर, कविता सुरडकर, रंजना वेळजकर आदीने केले आहे.