देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आझादी के अमृतमहोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने  आयोजित 75 वर्ष आझादी के अमृत महोत्सवानिमित्त  रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या   विद्यार्थिंनींनी   उत्स्फुर्त सहभाग नोंदवून  रांगोळीच्या माध्यमातून स्वातंत्र लढयामधील थोर समाज सुधारकांचा अप्रतिम संदेश दिला  आहे.त्यांच्या कार्याचा उल्लेख सुंदर रांगोळी व ब्रीद वाक्य टाकून तरुण पिढी समोर त्यांनी  केलेल्या बलिदानाची आठवण आजच्या तरुण पिढीला देण्यात आली. 

प्रिती साबळे, अक्षय  मंझा, भाऊसाहेब चव्हाण, प्रगती शर्मा, हरिश राऊत यांनी  विविध डिझाईनमध्ये  मोठ्या  रांगोळ्या काढल्या.मराठवाडा शिक्षण  प्रसारक मंडळाचे सचिव व आमदार सतीश चव्हाण यांनी  रांगोळी स्पर्धेला भेट दिली व सहभागी विद्यार्थ्यांचे  कौतुक केले यावेळी त्यांनी  इतर महाविद्यालयातीलविद्यार्थ्यांनी  या स्पर्धेच्या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन  केले.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार  प्रकाशदादा सोळुंके, उपाध्यक्ष  शेख सलीम शेख अहमद, कार्यकारिणी सदस्य विवेक भोसले,  नियामक मंडळाचे सदस्य विश्वास येळीकर यांनी रांगोळी प्रदर्शनाचे   कौतुक केले.
देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्राचे  संचालक डॉ. उल्हास शिउरकर व सर्व विभागप्रमुखांनी  या विद्यार्थ्यांना  मोलाची मदत केली. चालू घडामोडी म्हणजेच कोरोना व डिजीटल इंडिया दांडी यात्रा ,अशोक स्तंभ व आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करुन देण्याचा मोठा प्रयत्न्न केला आहे.