लता मंगेशकर एक स्वर तीर्थ

अरविंद वैद्य 

लता मंगेशकर या सात अक्षरी नावातच सप्तसुरांची सारी स्पंदने आहेत. सात दशकांहून अधिक काळापासून हा दैवी स्वर आपली सोबत करीत आला आहे, नव्हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. लतादीदी महाराष्ट्राच्या म्हणून आपला त्यांच्यावर अधिक अधिकार असला तरी या  स्वरांच्या मोहिनीने समस्त भारतच नव्हे तर सारे विश्व भारलेले आहेत. सामान्य माणसापासून अभिजात संगीताची आवड जोपासणाऱ्या थोरामोठ्यांनी पर्यंत सर्वांच्या जीवनात या स्वरांनी वेगळेच अधिष्ठान आहे. या स्वरांची जादू आणि मोहिनी विलक्षणच. 70 वर्षे उलटली पण त्यांनी आपली सोबत सोडलेली नाही. एवढा प्रदीर्घ कालखंड परंतु सारे कसे अगदी ताजे आणि टवटवीत वयपरत्वे दीदी आता गात नाहीत. परंतु त्यांची गाणी आपल्याला आजही साथ देत आहे. त्या अमर स्वरांची जादू विलक्षणच अष्टौप्रहर हा स्वर कुठे ना कुठे निनादत असतो. जणू परमेश्वरी आज अस्तित्वाची आपल्याला सुखद जाणीव करून देत असतो.

‘महल’च्‍या ‘आयेगा आनेवाला पासून ते दिलवाले’ ते ‘मेहंदी लगा के रखना’पर्यंतच्या स्वर यात्रेवर नजर टाकली तर या दिव्य स्वरांच्या स्मारक सामर्थ्याची प्रचिती येते. तुम्हाला सामान्यांच्या जीवनात हर्षाचा वसंत फुलवण्याचे अवघड काम हा स्वर्ग निष्ठेने करीत आला आहे. मानवी जीवनातील हर्ष, खेद, राग, अनुराग आणि भक्ती या सर्व भावनांचा अनुपम आविष्कार या स्वराने सातत्याने घडविला आहे. या सर्व भावनांच्या अभिव्यक्तीसाठी या स्वराने अजरामर केलेल्या गाण्यांचा गीतांचा व भावगीतांचा  आठव आपल्याला नेहमीच होतो. इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ साथ संगतीने हा स्वर आपल्याला जीवनाचे अविभाज्य अंग बनला आहे. त्यांच्या ताजेपणा दवबिंदू लाही लाजविणारा व झळाळी मुक्ती काला ही मागे सारणारी आहे. या कचकड्याच्या दुनियेत राहून या स्वराने ही किमया केली आहे हे विशेष.

या दुनियेत उगवतो त्याला सलाम करण्याची कमी नाही. परंतु अशा अवस्थेतही आपल्या आपला रुतबा आणि धबधबा या स्वरांनी कायम राखला आहे जीवनात जे जे महामंगल आहे त्याची फजिती हा स्वर देतो आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्दीत या स्वरांचे अपूर्व स्वर शिल्प उभे केले आहे. याची तुलना करायची तर वेरूळच्या कैलास लेणीच करावी लागेल.

जीवनाचा उभा कातळ फोडून उतरलेली ही अप्रतिम  काशीदकारी पाहिली की थक्क व्हायला होते. अर्थात त्यासाठी दीदींनी अपार कष्ट घेतले. हे लडकी की आवाज बहुत पतली हे, असे म्हणणारे निर्माते शशधर मुखर्जी असोत वा उर्दू शब्दांचा केला काय जमणार असे म्हणून प्रारंभी तिची हेटाळणी करणाऱ्याना तिचे म्हणजेच तिच्या स्वरांचे श्रेष्ठत्व मान्य करावेच लागले. काही संगीतकाराच्या कारकीर्द तिच्या स्वराने भरली तिने साथ सोडतात कोमेजली. संगीताच्या माध्यमातून एका संगीतकाराचे जोडलेला रेशीम धागा रेशमी धागा ही असाच अकस्मात तुटला. परंतु तिच्या स्वरावर त्याचा झालेला आघात ‘मेरे प्रीत का भाग जागा या अलबेला शब्दातून उमटला. अर्थात अनुराग आतून आलेला हा अनुभव दीदी चा स्वर आणखी गहिरा करून गेला.

आपल्याला सिद्ध करण्यासाठी दीदींनी प्रारंभी अपार कष्ट घेतले. हिंदी चित्रपटाचा तो जमाना उत्तरेतील मंडळीच्या वर्चस्वाचा होता. ही चिमुरडी  काय गाणारा. तिला ऊर्दू उच्चार तरी जमतील का. अशी शंका प्रारंभीच्या मंडळींनी व्यक्त केली. त्यांनाच पुढील काळात तिच्यापुढे अक्षरशा कुर्निसात करावा लागला. लता मंगेशकर यांच्या जीवनदायी स्वरांचा हा मोठाच विजय म्हणावा लागेल. आम्हा भारतीयांचे सारे जीवनाच्या स्वर वेली वेढले गेले आहे. घनश्याम सुंदरा प्रभात झाली द्वारे तो पहाटे जाग आणतो. प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई ने तो डोळ्यात पाऊस आणतो.

रसिक बलमा या शुद्ध कल्याण मधील जत टिपेच्या सुरातून अस्मानाला गवसणी घालण्याचे अद्भुत सामर्थ्य दर्शवून जाते. तर काटों से खीच के आचल मधून जीवनाची अनिवार ओढ दृग्गोचर करतो. कही दीप जले कही दिल सारखी अर्थात तुमच्या समोर दृश्य स्वरूपात उभी करते. तर अल्ला तेरो नाम चे धीरगंभीर स्वर वातावरणातील सारे मळभ दूर सारतात. धीरे से आजा रे बगियनमे ही लोरी ऐकता ऐकता पापण्याच्या काठावर निद्रादेवी कधी अलगद उतरते हे कळतही नाही. यारा सिली सिली ऐकताना दीदींचा स्वरात गावस्कर वा तेंडुलकरच्या ड्राईव्हची अनुभूती देतो, में सदी मे बेटी हू इस राह से कोई गुजरा नही द्वारे प्रतीक्षेतील वेदना विश नवता व्यक्त करते. तर मधु मागशी माझ्या सख्या परी मधून कविवर्य तांबे यांना प्रतिमेने आपली साथ सोडली की काय ही शंका सार्थपणे व्यक्त करतो. तर रुणुझुणु रे भ्रमरा मधून ज्ञानोबारायांच्या विटांणीतील अध्यात्म भाव अचूकपणे व्यक्त करतो.

किती उदाहरणे द्यावीत. स्वर्ग ही संकल्पना जर मान्य करायची असेल तर या स्वरांनी दाखविलेले. हे स्वरांची  मोहमयी विभ्रम हाच स्वर्ग होय असे छातीठोकपणे सांगता येईल. सध्याच्या मखमली कोंदणात बसवून ठेवावेत अशी अनेक रत्ने या स्वरांनी गाण्याच्या स्वरूपात बहाल केली आहेत. व्यक्तिपरत्वे त्याची अनुभूती व संग्रह निराळाच तेवढे गाणं क्षेत्रात या स्वराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक भाविक या तीर्थक्षेत्रावर हव्या त्या कुंडांवर जाऊन पाहिजे  त्या स्वरात डुंबू शकतो, या स्वरांच्या मालकिणीचे वास्तव्य मुंबईत पेडर रोडवर प्रभूकुंज मध्ये आहे. एका परीने ते योग्यच आहे. ईश्वर जिथे वास करतो तेथे स्वर राहणार. ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती हा स्वाद येतो

दीदींचा जन्म इंदूरचा. इंदूर शहर मिठाई साठी प्रसिद्ध आहे. मात्र या स्वरांच्या गोडीने तेथील सगळ्या मिठायांना मागे सारले आहे. इंदूरच्या स्वरांची ही मिठाई जगप्रसिद्ध आहे. मराठी भावगीतांच्या प्रांतात ही या स्वरांनी रसिकांना अगदी तृप्त केले आहे. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का. ह्रदयी जागा तू अनुरागा, किती नावे घ्यावी. मा दीनानाथ यांच्या गायकीची सारी कळा या स्वराने लीलया पेलली आहे. गळ्यात साक्षात गंधार असलेल्या हा स्वर म्हणजे रसिकांच्या अंगणातील कल्पवृक्षच आहे.

रसिकांनी आजवर जे जे इच्छिले ते ते या स्वरांनी त्यांच्या पदरात का टाकले आहे. कृष्णाच्या अवनीतलावावर  विसरलेला पावा म्हणजे हा स्वर होय.  मला तर असे वाटते की हा स्वर आपल्या कानातच नव्हे तर रक्तात पूर्णपणे भिनला आहे. रेडिओ, टीव्ही, टेपरेकॉर्डर, मोबाईल यावर हा स्वर वास करून असला तरी त्याचे गुंजन जेव्हा आपल्या मनात सुरू होते, तेव्हाचा आनंद हा शब्दात पकडणे अवघड.

अचूक स्वरफेक, लगाव ही सारी वैशिष्ट्ये हा स्वर जन्मताच समवेत घेऊन आला आहे. ये कभी भी बेसुरा होता नही ही, उस्ताद अमीर खान साहेब यांनी या स्वराला दिलेली दाद तिचे श्रेष्ठत्व अधोरेखित करून जाते. बडे गुलाम अली खाँ साहेब यांच्या कलकत्त्यातील एका कार्यक्रमात दीदी  मागे तंबोऱ्यावर बसल्या होत्या. त्या वेळी साथ देताना त्यांनी घेतलेल्या तानांनी साऱ्यांनाच अचंबित केले होते. या स्वराला जसे प्रखर आत्मभान आहे तसेच समाजाचे आपण काही देणे लागतो याचे ही जाण आहे. अगदी उर्दू भाषेचा आधार घेऊन व साहिल रुमानी यांचा एक शेर उद्युक्त करणाऱ्या करण्याचा मोह आवरत नाही

नगमा का साथ दिया है

सुरोंको अहसास दिया है

तेरी आवाज मे हमने

जिंदगी को महसूस किया है


हे स्वरा तीर्थ म्हणजे ब्रह्मपुत्रेचे विशालता, गंगेचा उगम, नर्मदेची विस्तीर्णता याचा अद्भुत संगम होय. आनंद विधान सुखाची परमावधी व कैवल्याची अनुभूती होय