केंद्रीय अर्थसंकल्प 2022 भारताला जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका निभावण्यास तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून शतकमहोत्सवापर्यंत प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी वाव देतो – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली ,५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-केंद्रीय अर्थसंकल्प 2022, भारताला जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी  तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून ते शतकमहोत्सवी वर्षांपर्यंत प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी  वाव देत असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्प 2022-23 वर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या  विशेष परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात नामवंत अर्थतज्ञ, विचारवंत, उद्योग-व्यापार क्षेत्रातील नामवंत व्यक्ति यांच्यासह अनेक संबंधित उपस्थित होते.

आज संपूर्ण जग भारताचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे, मात्र प्रश्न हा आहे की आपण जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध झालो आहोत का? अशी विचारणा करतानाच  अर्थसंकल्प 2022 या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देतो असे ते म्हणाले. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावर आधारित अर्थव्यवस्थेच्या आधारावर भारत एक मोठी झेप घेण्यास सज्ज असल्याचेच या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होते. तसेच, भारताच्या आतापर्यंत वापरल्या न गेलेल्या क्षमता, ज्यात सखोल सागरी संसाधनांचाही समावेश आहे, त्यांचा वापर करत स्वतःला समृद्ध करण्याची संधी या अर्थसंकल्पातून आपल्याला मिळणार आहे.