ऑक्सीजन प्लांट बिडकीनच्या आरोग्य सुविधेला पुरक-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Displaying WhatsApp Image 2022-02-04 at 6.39.25 PM.jpeg

औरंगाबाद,४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालायात उपचारासाठी खेड्यापाड्यातील रुग्ण येत असतात.या रुग्णालयात बालरोग विभाग, प्रसुती कक्ष तसेच कोविड बाधीतावर उपचार केले जातात यामध्ये  ग्रामीण भागतील रुग्णांना आरोग्य सुविधा सहज आणि तत्पर मिळण्यासाठी  पीएस.ए.प्लांट पुरुक ठरणार असल्याचे प्रतिपादन बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील पीएस.ए.प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

Displaying WhatsApp Image 2022-02-04 at 6.39.23 PM.jpeg

          यावेळी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, पैठणचे तहसीलदार माधव निलावड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय दळवी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ.शारदा खरात, तसेच कॅनपॅक इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम पोतदार,  कॅनपॅकचे इंडिया पर्चेस हेड जनार्दन काळे यांची उपस्थिती होती.

Displaying WhatsApp Image 2022-02-04 at 6.39.29 PM.jpeg

          सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून वाळूज येथील कॅनपॅक इंडिया. प्रा.लि. यांच्याकडून उभारण्यात आलेल्या जीवनावश्यक वैद्यकीय ऑक्सीजन प्लांटची उभारणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. या प्लांटचा फायदा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ आलेल्यासाठी होणार असून, तात्काळ वैद्यकीय मदतीचा म्हणून ऑक्सीजनची उपलब्धता करण्यासाठी रुग्णालय आवारातच प्रतिमिनिट 158 लिटर क्षमता असणाऱ्या प्लांटमधून ऑक्सीजनची निर्मिती होत आहे. आज बिडकीन येथील ग्रामीण रुग्णलायात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने येथेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊन आरोग्यसुविधेत भर टाकणारा आणि आरोग्यास पुरक ठरेल. हा प्लांट मधून रुग्णांना उपचारासाठी लागणारा ऑक्सीजन बाहेरुन विकत न घेता मोफत उपलब्ध झाल्याने आरोग्याच्या सुविधेसाठी साह्यभूत ठरेल. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.