सिनेमासृष्टीतले ‘देव’ हरपले, रमेश देव यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.हृद्यविकाराच्या झटक्याने रमेश देव यांचं निधन झालं आहे. रमेश देव यांचे पुत्र अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.रमेश देव यांनी संपूर्ण हयात ही सिनेसृष्टीला दिली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत असंख्य मराठी आणि हिंदी सिनेमात भूमिका वठवली. एका ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन झाल्यानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

30 जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता. मराठीसोबत हिंदी सिनेमातही अनेक महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी वठवल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांसह दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यापैकीच एक होते. त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली होती. 30 जानेवारील 1929 रोजी त्यांचा जन्म झाला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीम देव) यांच्यासोबत लग्न केलं होतं.रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती.

रमेश देव यांच्या सिनेकारकिर्दीची सुरुवात ही 1950 मध्ये झाली. त्यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही आपल्या भूमिकेची छाप सोडली. सुरुवातीला त्यांना हिंदीत छोट्या भूमिका मिळाल्या. मात्र त्यानंतर त्यांना हिंदी सिनेमात सहकलाकाराचा भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 

रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलेले आहे. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. फक्त मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रमेश देव यांनी दर्जेदार भूमिका केल्या होत्या. 

देव यांनी ‘अंधाला मगटो एक डोला’ (१९५६) या चित्रपटातून करमणूक उद्योगात पदार्पण केले. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट “आरती” होता. त्याशिवाय 2013 मधील 11 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीआयएफएफ) रमेश देव यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरविण्यात आले.

१९५१ मध्ये बालकलाकार म्हणून “पटलाची पोर” चित्रपटात

रमेश देव यांचा जन्म अमरावतीत झाला पण ते प्रत्यक्षात जोधपूर राजस्थानचे आहेत. त्यांचे मोठे आजोबा अभियंता होते आणि वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. रमेश १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून “पटलाची पोर” चित्रपटात दिसले. त्यांनी ‘सीमा देव’ या नामांकित अभिनेत्रीशी लग्न केले. या दोघांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुलगे आहेत. अभिनय हा चित्रपट दिग्दर्शक आहे, त्याने २०११ मध्ये ‘दिल्ली बेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजिंक्य हेदेखील एक अभिनेता आहे.

रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले. त्यांनी “दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका केली होती. देव यांना ‘मुजर्मि’, ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. रमेश देव यांनी कौल साहबच्या रूपात 2013 मध्ये “जॉली एलएलबी” चित्रपटात काम केले होते. 2016 मध्ये त्यांनी ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात काम केले होते. देव २५० पेक्षा जास्त चित्रपटांचा भाग होते. रमेशला लाइफ टाईम अवॉर्डिअर पुरस्काराने गौरविण्यात आले.