राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतेयावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहेपाच लाख रु. रोखमानचिन्ह आणि मानपत्रअसे पुरस्काराचे स्वरुप आहेमराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

श्रीपुभागवत पुरस्कार (२०२१लोकवाङ्मय गृहमुंबईया संस्थेला जाहीर करण्यात आलातीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहेडॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आलादोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहेकविवर्य मंगेश पाडगांवकरमराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१व्यक्तींसाठीडॉचंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आलाडॉअशोक केळकरमराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठीमराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आलातर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठीमराठी अभ्यास केंद्रमुंबई यांना जाहीर करण्यात आला.

यावेळी स्वयशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आलीत्याची यादी खालील प्रमाणे.

अ.क्र.पुरस्कारपुरस्कार प्राप्त व्यक्ती/संस्थेचे नावपुरस्काराचे स्वरुपअनुभव/कार्य
1.विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021श्री. भारत सासणेरु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्रविविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार प्राप्त, प्रकाशित ग्रथांची संख्या 35
2.श्री. पु. भागवत पुरस्कार  2021लोकवाङ्मय गृह, मुंबईरु. 3 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्रमराठी विज्ञान परिषद तथा अन्य अनेक पुरस्कार प्राप्त प्रकाशित ग्रथांची संख्या 1374
3.डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021  (व्यक्तींसाठी)डॉ. रमेश वरखेडेरु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्रबाल साहित्य, लोकसाहित्य, समाज भाषा विज्ञान या साहित्य प्रकारात  विपुल लेखन, पुणे विद्यापीठात “व्यावहारीक मराठी” चा अभ्यासक्रम
4.कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021  (व्यक्तींसाठी)डॉ. चंद्रकांत पाटीलरु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र साहित्य विषयक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय 18 पुरस्कार प्राप्त, 5लेख संग्रह, 24 अनुवाद एकुण 54 हून अधिक पुस्तके प्रकाशित
5.डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021  (संस्थेसाठी)मराठी अभ्यास परिषद, पुणे.रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्रमराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानांचे अशा उपक्रमाचे आयोजन, भाषा आणि जीवन हे भाषा विषयक त्रैमासिक 1983 पासून नियमितपणे प्रकाशित
6.कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021  (संस्थेसाठी)मराठी अभ्यासकेंद्र, मुंबईरु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्रमराठी भाषेचे संस्कृतीचे जतन संवर्धनासाठी कार्य, मराठी भाषेच्या वेगवेगळया प्रश्नावर संशोधन, मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासाठी विविध उपक्रम

               स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन – 2020

.क्र.वाङ्मय प्रकारपुरस्काररक्कम रु.लेखकाचे नावपुस्तकाचे नांवप्रकाशन संस्था
1)प्रौढ वाङ्मय – काव्यकवी केशवसुत पुरस्कार 1,00,000/-हेमंत दिवटेपॅरानोयापोएट्रीवाला पेपरवॉल मीडीया अण्ड पब्लिशिंग प्रा.लि., चे इम्प्रिंट, मुंबई
2)प्रथम प्रकाशन – काव्यबहिणाबाई चौधरी पुरस्कार 50,000/-राजू देसलेअवघेचि उच्चारकॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा.लि.,गाजियाबाद, दिल्ली
3)प्रौढ वाङ्मय –
नाटक/एकांकिका
राम गणेश गडकरी पुरस्कार 1,00,000/-जयंत पवारलिअरने जगावं की मरावं ?पंडित पब्लिकेशन्स, सिंधुदुर्ग
4)प्रथम प्रकाशन –
नाटक/एकांकिका
विजय तेंडूलकर पुरस्कार 50,000/-शिफारस नाही
5)प्रौढ वाङ्मय – कादंबरीहरी नारायण आपटे पुरस्कार 1,00,000/-भीमराव वाघचौरेकिंजाळकाटेसंस्कृती प्रकाशन, पुणे
6)प्रथम प्रकाशन – कादंबरीश्री.ना.पेंडसे पुरस्कार 50,000/- अविनाश उषा वसंतपटेलीललित पब्लिकेशन, मुंबई
7)प्रौढ वाङ्मय – लघुकथादिवाकर कृष्ण पुरस्कार1,00,000/-माधव जाधवचिन्हांकित यादीतली  माणसंसायन पब्लिकेशन्सप्रा.लि., पुणे
8)प्रथम प्रकाशन – लघुकथाग.ल.ठोकळ पुरस्कार50,000/- रुस्तम होनाळेवऱ्हाडातली बिऱ्हाडंदिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
9)प्रौढ वाङ्मय – ललितगद्य(ललित विज्ञानासह)अनंत काणेकर पुरस्कार1,00,000/-अरुण खोपकरअनुनादमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
10)प्रथम प्रकाशन –ललितगद्यताराबाई शिंदे पुरस्कार 50,000/-डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीसमंचसाधना प्रकाशन, पुणे
11)प्रौढ वाङ्मय – विनोदश्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार1,00,000/-सॅबी परेराटपालकीग्रंथाली, मुंबई
12)प्रौढ वाङ्मय – चरित्रन.चिं.केळकर पुरस्कार 1,00,000/-डॉ. अक्षयकुमार काळेगालिब : काळ,चरित्र आणि व्यक्तिमत्त्वपद्मगंधा प्रकाशन, पुणे   
13)प्रौढ वाङ्मय – आत्मचरित्रलक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 1,00,000/-डॉ. शाहू रसाळरानफूल, लव्ह बर्डस् आणि…मीडिंपल पब्लिकेशन, पालघर
14)प्रौढ वाङ्मय – समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखनश्री. के. क्षीरसागर पुरस्कार1,00,000/-गंगाधर पाटीलकलाकृती  आणि समीक्षामॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
15)प्रथम प्रकाशन –
समीक्षा सौंदर्यशास्त्र
रा.भा.पाटणकर पुरस्कार50,000/-शिफारस नाही
16)प्रौढ वाङ्मय –
राज्यशास्त्र/समाजशास्त्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार1,00,000/-उत्तम कांबळेअस्वस्थ शतकातील माणगाव परिषदलोकवाङ्मय गृह, मुंबई
17)प्रौढ वाङ्मय – इतिहासशाहू महाराज पुरस्कार 1,00,000/-शशिकांत गिरिधर पित्रेया सम हाराजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
18)प्रौढ वाङ्मय –
भाषाशास्त्र/व्याकरण
नरहर कुरूंदकर पुरस्कार 1,00,000/-औदुंबर सरवदेबोलीविज्ञानभाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
19)प्रौढ वाङ्मय –
विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)
महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 1,00,000/-डॉ.बाळ फोंडकेकरोनाष्टकमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
20)प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासहवसंतराव नाईक पुरस्कार 1,00,000/-शिफारस नाही
21)प्रौढ वाङ्मय –
उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार1,00,000/-अनंत केदारेवाग्दानसुगावा प्रकाशन, पुणे
22)प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखनसी.डी. देशमुख पुरस्कार 1,00,000/-शिफारस नाही
23)प्रौढ वाङ्मय –
तत्त्वज्ञान व मानसशास्त्र
ना.गो.नांदापूरकर पुरस्कार1,00,000/-डॉ. शोभा पाटकरमना मना,दार उघडलोकवाङ्मय गृह, मुंबई
24)प्रौढ वाङ्मय –  शिक्षणशास्त्रकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार1,00,000/-डॉ.राणी बंग व करुणा गोखलेतारुण्यभानराजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे   
25)प्रौढ वाङ्मय – पर्यावरणडॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार1,00,000/-डॉ. मृदुला बेळेकोरोनाच्या कृष्णछायेत …राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
26)प्रौढ वाङ्मय –
संपादित/ आधारित
रा.ना.चव्हाण पुरस्कार1,00,000/-संपादकराम जगताप व भाग्यश्री भागवतमायलेकी बापलेकी डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
27)प्रौढ वाङ्मय – अनुवादिततर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार1,00,000/-अनुवादकमिलिंद चंपानेरकरद ग्रेप्स ऑफ रॉथरोहन प्रकाशन, पुणे
28)प्रौढ वाङ्मय –
संकीर्ण (क्रीडासह)
भाई माधवराव बागल पुरस्कार1,00,000/-धनंजय जोशीसहजरोहन प्रकाशन, पुणे
29)बालवाङ्मय – कविताबालकवी पुरस्कार50,000/-एकनाथ आव्हाडशब्दांची नवलाईदिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
30)बालवाङ्मय –
नाटक व एकांकिका
भा.रा. भागवत पुरस्कार 50,000/-शशिकांत बा. पाताडेभातुकली आणि तीन धमाल बालनाटयआदित्य प्रकाशन, सांगली
31)बालवाङ्मय –  कादंबरी साने गुरूजी पुरस्कार50,000/-डॉ. श्रीकांत पाटीलसिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहलहृदय प्रकाशन, कोल्हापूर
32)बालवाङ्मय – कथा
( छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह)
राजा मंगळवेढेकर पुरस्कार 50,000/-वसीमबार्री मणेरमौजे पुस्तक संच 1दवात ए दक्कन, फलटण
33)बालवाङ्मय –
सर्वसामान्य ज्ञान(छंद व शास्त्रे)
यदुनाथ थत्ते पुरस्कार50,000/-किशोर माणकापुरेविद्यार्थी दशेत महापुरुष अभ्यासताना …!तेजश्री प्रकाशन, कोल्हापूर
34)बालवाङ्मय – संकीर्णना.धो. ताम्हणकर पुरस्कार 50,000/-डॉ. वैशाली देशमुखटीएनएज डॉटकॉम # 2राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
35)सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारसयाजी महाराज गायकवाड पुरस्कार1,00,000/-गजानन यशवंत देसाईओरबिनयशअमृत प्रकाशन, गोवा