जालन्यात दिवसाढवळ्या एका महिलेचे सव्वालाखाचे सोन्याचे दागिने लुटले

जालना ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जालना शहरातील भामट्यांनी  रस्त्यावर दिवसाढवळ्या एका महिलेचे सव्वालाखाचे सोन्याचे दागिने लुटले नवीन जालना शहरात भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. 
जालना शहरातील म्हाडा कॉलनी (मंठा चौक) भागातील  लीला मदनलाल सोनी (वय 68) या बुधवारी  दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी स्कुटीवरून शिवाजी महाराज पुतळ्याकडून फुले मार्केटकडे जात होत्या. त्यांना अमर छाया टॉकीज जवळ दोन भामट्यांनी आडवे आम्ही क्राईम बघायचे पोलिस आहोत पुढे तपासणी सुरू आहे, असे सांगून तुमच्या गाडीची डिक्की तपासू द्या असे सांगितले. त्या भामट्यांनी  सोनी यांच्या गळ्यातील, हातातील, बोटातील सुमारे 1लाख 17 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढण्यास सांगून, स्कुटीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले.व दागिने डिक्कीतून दिशाभूल करून लांबविले. 

या प्रकारानंतर  सोनी यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ भताने, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक उद्धव चव्हाण यांनी   घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी पथके रवाना केली आहेत