वैजापूर शिक्षक संघ महिला आघाडीने केला स्त्री शक्तीचा सन्मान

वैजापूर ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र  राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन नारायणराव साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष राजेश आत्राम व जिल्हा सहप्रसिद्धप्रमुख गणेश पगारे यांच्यासहकार्याने  शिक्षक संघ महिला आघाडीने सन्मान स्त्री शक्तीचा ,जागर अस्तित्वाचा या कार्यक्रमांतर्गत संक्रातीनिमित्त होणाऱ्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला फाटा देत तालुक्यातील विधवा महिलांचा द्वितीय वर्षी सन्मान केला.यामध्ये विधवा सैनिक पत्नी,शिक्षक पत्नी व सर्वसामान्य विधवा महिलांचा सन्मान करून तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौभाग्यवती संगीताताई बोरणारे तर प्रमुख पाहुणे म्हणून  नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी , पंचायत समितीच्या सभापती सिनाताई मिसाळ, पं.स.सदस्या माधुरीताई गलांडे, शहीद सैनिक पत्नी आरती थोरात,दिपाली जोरी तसेच डॉ दिपाली इंगळे ,आशा लोढा ,अर्चना लोढा उपस्थित होत्या.

प्रत्येक माना-पानाच्या कार्यक्रमापासून विधवा महिला भगिनींना समाजचालीरीतीनुसार डावलले जात असताना मकर संक्रातीच्या निमित्ताने होणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास शिक्षक संघ महिला आघाडीने फाटा देत विधवा महिलांना आधार देत सन्मान केला.याप्रसंगी विविध उपस्थित मान्यवरांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापेक्षा अशा प्रकारचे सामाजिक जनजागृती करणारे व जुन्या चालीरीती मोडीत काढून विधवा स्रियांना ताठ मानेने व मानपान देणारे कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.   

यावेळी महिला आघाडीच्या प्रेमा पानपाटील, विद्या देशमुख,प्रमिला खैरे, वनिता दयाटे ,मीरा टेके, उषा देशमुख,मंगल सोनवणे, आशा मोरे, छाया उचित, प्रतिभा काकळीज, वसुंधरा देवरे, स्मिता शिरोळे, अनिता नांदे, शर्मिला विधाटे, निशिगंधा दलाल, निर्मला भोये, दिपाली जोरी (सैनिक पत्नी ), मनिषा गायकवाड, धनश्री तारळकर आदीनीं परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशिगंधा दलाल, सूत्रसंचालन मीरा टेके तर आभार वनिता दयाटे यांनी मानले.