सभागृहाची प्रतिष्ठा जपत गांभीर्याने चर्चा व्हावी-पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसदेच्या 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

नवी दिल्ली ,३१ जानेवारी / प्रतिनिधी :-आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत आहे.मी तुम्हा सर्वांचे आणि देशभरातील सन्माननीय संसद सदस्यांचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वागत करतो.आजच्या जागतिक परिस्थितीत, भारतासाठी विपुल संधी उपलब्ध आहेत. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन, जगभरात केवळ भारताची आर्थिक प्रगतीच नव्हे, तर भारतातील लसीकरण अभियान, भारताने स्वतः संशोधन करुन विकसित केलेली लस संपूर्ण जगात भारताविषयी एक विश्वास निर्माण करणारी  ठरली आहे.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, आम्हा सर्व खासदारांची चर्चा, आपल्या खासदारांच्या चर्चेचे मुद्दे, मोकळ्या मनाने केलेली चर्चा, जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करण्याची एक महत्वाची संधी ठरू शकते.

मला आशा आहे, की सर्व आदरणीय खासदार, सर्व राजकीय पक्ष, अधिवेशनात मोकळ्या मनाने चर्चा करुन, प्रगतीच्या मार्गांवर वाटचाल करण्यासाठी, त्याला गती देण्यासाठी निश्चितच मदत करतील.

ही खरे आहे, की वारंवार होत असलेल्या निवडणुकांचा परिणाम या अधिवेशनांवरही होतो, चर्चावर देखील त्याचा परिणाम जाणवतो. मात्र, मी सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करतो, की निवडणुका आपल्या जागी असतात, त्या सुरुच राहणार आहेत.मात्र आपण सभागृहात.. संसदेचे हे अधिवेशन, एकप्रकारे पूर्ण वर्षभराचा आराखडा मांडणारे असते आणि म्हणूनच ते खूप महत्वाचेही असते. आपण सर्वांनी पूर्ण कटिबद्धतेने, हे अधिवेशन जितके जास्त फलदायी ठरवू शकू, तेवढ्याच जास्त संधी आपल्याला आगामी आर्थिक वर्षात, देशाची प्रगती करण्यासाठी मिळू शकतील.

मुक्त चर्चा व्हावी, सभागृहाची प्रतिष्ठा जपत गांभीर्याने चर्चा व्हावी, मानवी संवेदनांचा विचार करुन चर्चा व्हावी, उत्तम उद्देशाने चर्चा व्हावी, ही अपेक्षा व्यक्त करत सर्वांना खूप खूप धन्यवाद !