‘मन की बात ‘ कार्यक्रमाचा येरगीत असंख्य नागरिकांनी घेतला लाभ

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती   

Displaying IMG-20220130-WA0319.jpg

नांदेड : भारताचे कणखर नेतृत्व, जागतिक कीर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या आकाशवाणी, दूरदर्शन वरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे  देगलूर तालुक्यातील येरगी येथे आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Displaying IMG-20220130-WA0203.jpg

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात. देशातील नागरिकांशी संवाद साधत असताना भारतातील अमुलाग्र बदल, विविध विकास योजना,  विविध संदर्भ, विविध संशोधन आणि सबका साथ सबका विकास या अनुषंगाने मन की बात मधून पंतप्रधान मोदी संवाद साधत असतात. देश-विदेशातही ‘  मन की बात ‘ कार्यक्रमाने प्रचंड लोकप्रियता मिळविलेली आहे. भारतातील विविध भागातील शेतकरी, पत्रकार ,लोकप्रतिनिधी ,संशोधक, वैज्ञानिक, विचारवंत आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असतात. एवढेच नाही नवीन संशोधन करणाऱ्या संशोधकांचे मनोबल वाढवत राष्ट्राची एकता एकात्मता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठीही मन की बात मधून संवाद साधला जातो. राष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्रीय योजना पोहोचविण्याच्यासाठी, भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी,  विकासाचा चढता आलेख पुढे नेण्यासाठी मन की बातच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद महत्त्वपूर्ण असतो. 

मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रसारण देशातील सर्वच आकाशवाणी केंद्रावरून करण्यात येते. जानेवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी अर्थात 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या मन की बात कार्यक्रमाचे सर्व बुथ स्तरावर आयोजन करावा असे भाजपा प्रदेश स्तरावरून दिलेल्या कार्यक्रमानुसार देगलूर तालुक्यातील येरगी येथे मन की बात कार्यक्रमाचे आयोजन  सरपंच संतोष पाटील यांनी केले होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून नऊ कोटी ४१ लाख रुपये मंजूर

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या झरी पेटपल्ली रस्त्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून नऊ कोटी ४१ लाख रुपये मंजूर केल्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. आतापर्यंत या रस्त्याच्या उभारणीसाठी कुणीही निधी उपलब्ध करून दिला नव्हता. मात्र खा. चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे नऊ कोटी  ४१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , माजी आमदार तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुभाषराव साबणे, प्रदेश कार्यकारी सदस्य रामदास पा.सुमठाणकर,जि.प.सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस  लक्ष्मण ठक्करवाड ,  शिवराज पा.माळेगावकर,  शिवाजी कनकंटे,शहराध्यक्ष अशोक अण्णा गंदपवार, आनिल पा खानापूरकर,प्रा.उत्तमराव काबळे,शिवकुमार देवाडे जि.चिटणीस तथा मन की बात संयोजक येरगी गावचे सरपंच संतोष पाटील,ग्रा.पं.सदस्य,भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येनी उपस्थित होते.

झरी पेटपल्ली रस्त्याच्या उभारणीसाठी    अनेक वर्षांची या भागातील नागरिकांची मागणी होती मात्र कोणत्याही नेत्यांनी रस्ते विकासासाठी प्रयत्न केला नव्हता .प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार झाल्यापासूनच देगलूर आणि परिसराच्या विकासासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल अनेक नागरिकांनी , ग्रामस्थांनी खासदार चिखलीकर यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.