पंतप्रधान मोदी यांच्या “मन की बात” मधून वैजापूरकरांनी घेतली स्वच्छता निर्मूलनाची प्रेरणा

वैजापूर ,३० जानेवारी / प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात”  या वर्षीच्या पहिल्याच कार्यक्रमातून वैजापूरवासीयांनी  रविवारी रोजी मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे शहरात स्वच्छता अभियान,प्लास्टिक निर्मूलन,कोरोना निर्मूलन व वृक्ष संवर्धन सारखे उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.
शहरातील संताजी व्यापारी संकुलात भाजपचे गौरव दौडे, ज्ञानेश्वर माऊली, प्रशांत कंगले यांनी शहरातील जेष्ठ तसेच युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमात सहभागी करून घेऊन केंद्राच्या शासकीय योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्यासाठी उपस्थितांना सहकार्याचे आवाहन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा आपल्या “मन की बात” मध्ये उल्लेख करून भारतीय कला,कौशल्य,संस्कृतीचा गौरव केला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी ही सहभाग नोंदविला.सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनीही सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, रवींद्रआप्पा साखरे, सुदामआप्पा गोंधळे, बबन क्षीरसागर, केशव आंबेकर, सुभाष आंबेकर, ललित काथवटे, राम निकम श्री.बसवेकर यांच्यासह जेष्ठ नागरीक व युवक उपस्थित होते