डंपिंग ग्राऊंडमुक्त जालन्यासाठी लोकसहभाग वाढवावा: स्वच्छता दुत इंजि. अनया अग्रवाल

जालना शहरालगत असलेल्या डंपिंग ग्राऊंड वर कचरा विलगीकरण व पुर्नप्रक्रिया होत नसल्याने कचऱ्यास मिथेन वायू मूळे  आग लागून होणारे विषारी प्रदुषण आरोग्यास घातक असून डंपिंग ग्राऊंड मुक्त जालना शहरासाठी प्रशासनाने लोकसहभाग वाढाविण्यावर भर द्यावा. अशी मागणी स्वच्छता दुत इंजि. अनया अग्रवाल यांनी केली आहे. 
जालनेकरांना कचरा प्रदूषणापासून भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत वेळीच उपाययोजना करण्यासाठी म. गांधींच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून रविवारी ( ता. 30) प्रसिद्धीस दिलेल्या पञकात स्वच्छता दुत इंजि. अनया अग्रवाल यांनी म्हटले आहे, डंपिंग ग्राऊंड वर गोळा होणाऱ्या कचऱ्यात आपोआप निर्माण होणाऱ्या ज्वलनशील  मिथेन वायूमुळे ‘डायऑक्सीन’ हा मानवी शरीरास अत्यंत घातक वायू शहरात फैलावत असून साथरोग पसरत चालले, शिवाय शहरवासीयांच्या  रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होत असल्याचे झणझणीत वास्तव इंजि. अनया अग्रवाल यांनी निदर्शनास आणून दिले. डंपिंग ग्राऊंड मुक्ती साठी नागरिकांनी कचऱ्याच्या उगमस्थाना पासून  विलगीकरण करण्यास सुरुवात करावी. असे सांगून इंजि.अनया अग्रवाल म्हणाल्या, ओल्या कचऱ्या पासून  कंपोस्ट खत निर्मितीसाठी संबंधित केंद्रावर कचरा घेऊन जावा, सूका कचरा एम. आर. एफ. केंद्रावर छाटणी होऊन तो पुर्नवापरासाठी पाठवावा. असे केल्यास “डंपिंग ग्राऊंड वर कचरा जाणार नाही.त्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरण करावे आणि प्रशासनाने पुढील प्रकिया करावी. असे आवाहन स्वच्छता दुत इंजि. अनया अग्रवाल यांनी केले.