औरंगाबादेत आजपासून कडक संचारबंदी ,वाचा काय सुरु ,काय बंद राहणार ?

औरंगाबाद –
करोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी उद्या शुक्रवारपासून कडक संचारबंदी (जनता कर्फ्यू ) पुकारण्यात आला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत पुकारलेला हा लॉकडाऊन 10 ते 18 जुलै दरम्यान असणार आहे. या काळात औषधी दुकाने, दवाखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय एलपीजी सिलिंडरची होम डिलेव्हरी करता येणार असून बँका सुरु राहणार असल्या तरी बँकांना ग्राहकांशी व्यवहार करता येणार नाही.
दुचाकीवरुन फिरण्याची मुभा
– न्यायालयाचे अधिकारी – कर्मचारी , न्यायाधिश, वकील
– वृत्तपत्र व डिजीटल माध्यमांचे प्रतिनिधी,कर्मचारी
– राज्य व केंद्र शासनाचे प्रतिनिधी
– शासन अंगीकृत ऑफीसचे अधिकारी – कर्मचारी
– आरोग्य सेवेतील कर्मचारी , आशा वर्कर , परिचारिका, अंगणवाडी सेविका
– औषधी दुकानातील कर्मचारी , औषध निर्मिती कंपनीतील कर्मचारी
– दुध विक्रेते
– कृषी बी बियाणे, खत विक्रेते, गँस वितरक, पाणी पुरवठा व स्वच्छता कमचारी
– महापालिका व पोलीस विभागाचे कर्मचारी ,अधिकारी
– सर्वेक्षण करणारे कर्मचारी
या आस्थापना बंद राहतील
– सगळी किराणा दुकाने, व्यावसायिक दुकाने, सगळ्या प्रकारचे उद्योग. किराणा दुकानांना घरपोच डिलेव्हरीची मुभा
– मैदाने, क्रीडांगणे, मोकळ्या जागांवर फिरण्यास बंदी
– उपहारगृह, लॉज, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, भाजी बाजार
– सलून , मसाज पार्लर , स्पा ची दुकाने
– जाधववाडी, जुनामोंढा, भाजी मार्केट
– मालवाहतुक
– शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था
– सगळ्या प्रकारची बांधकामे
– करमणुकीची साधने, मंगल कार्यालये , धार्मिक सभा
– सगळ्या प्रकारच्या खासगी आस्थापना, ऑफीसेस
काही निर्बंधांसह या सेवा सुरु राहतील
– खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा
– सगळी रुग्णालये व त्यांच्याशी निगडीत असलेल्या सेवा
– लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना सेवा नाकारता येणार नाही, सेवा नाकारली तर कारवाई
– सगळी औषधी दुकाने चोवीस तास सुरु राहतील
– शासकीय पेट्रोलपंप सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत सुरु राहतील
– या पेट्रोल पंपांवर केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने यांनाच इंधन मिळेल
– गँस एजन्सी व घरपोच गँस सिलिंडरची सेवा
– शासकीय स्वस्त धान्य दुकाने नियमित वेळेनुसार सुरु राहतील
– वृत्तपत्रांचे वितरण, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची कार्यालये सुरु राहतील
– आरबीआयच्या मान्यताप्राप्त बँका सुरु राहतील,ग्राहकांशी व्यवहार करता येणार नाही
– बँकांची ऑनलाईन सेवा, एटीएम सेवा सुरु राहील