संचारबंदीत उद्योग सुरू ठेवण्यास अटी व शर्तींच्या अधीन परवानगी -सुभाष देसाई

संचारबंदीचे काटेकोर पालन करत कोरोनाची साखळी तोडण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

Displaying DSC_6081.JPG

औरंगाबाद दि. 09 :- जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  10 ते 18 जुलै 2020 दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली असून या कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी व शर्तींच्या अधीन परवानगी असणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले. शासनाचे जे उद्योगाबाबतचे धोरण आहे, त्याला अनुसरून त्यांनी वरील प्रमाणे जिल्हा प्रशासनास निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील संचारबंदी अंमलबजावणी बाबत सूचना देतांना पालकमंत्री श्री. देसाई यांनी उद्योग क्षेत्र सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या.त्यानुसार जिल्ह्यात  औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार चालु राहणार व यासाठी एमआयडीसी पोर्टल वरून या पुर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी असून चिकलठाणा, वाळुज, रेल्वे स्टेशन एमआयडीसी व औरंगाबाद शहरा व्यतिरिक्त ईतर एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील उद्योग चालु राहणार आहेत. जे उद्योग समुह कामगारांची 10 दिवस फॅक्टरी मध्ये निवास व्यवस्था करणार आहे, त्यांना द्योग चालु ठेवण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगही चालु राहणार.औद्योगिक क्षेत्रानजिकच्या खेड्यांमधील कामगारांची वाहतुक कार किंवा निश्चित बसने सुरु राहणार आहे. आरोग्याबरोबरच आर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले आहे.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी संचारबंदीची मागणी लोकप्रतीनिधी, जनतेतूनही होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासह सर्वांनी जनसहभागातून 10 ते 18 जूलै दरम्यान संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी करावी. जेणेकरून कोरोना संसर्ग आपल्याला रोखता येईल. त्यासोबतच या संचारबंदीत चाचण्या आणि सर्वेक्षणाचे प्रमाण वाढवावे. कोरोनासंसर्गात मृत्यू दर शून्यावर आणण्याचे आव्हान आपल्या समोर आहे, त्यादृष्टीने विलगीकरण कक्षांची, आरोग्य सुविधांची वाढ करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी यावेळी दिले.corona

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *