भाजपनं वचन मोडलं म्हणून नवा घरोबा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला

स्वार्थासाठी भाजपकडून हिंदूत्वाचा वापर- उद्धव ठाकरे

हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.

मुंबई ,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपनं शिवसेनेला वापरलं आणि फेकून दिल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं आहे. तसेच शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली, अशी टीका करतानाच भाजपनं वचन मोडलं म्हणून नवा घरोबा करावा लागला, असं स्पष्टीकरण त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना दिलं.  ‘भाजपचे हिंदूत्व हे बेगडी हिंदूत्व आहे.  आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्त्वाला सोडले नाही. कदापी सोडणार नाही. त्यांचे हिंदूत्व दिसतंय, ते नव हिंदूत्वावादी आहे, स्वार्थासाठी हिंदूत्वाचा वापर करत आहे, असं म्हणत म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

‘भाजपची ती नीतीच आहे, वापरायचं आणि फेकून द्यायचं. भाजपच्या लोकांचे तेव्हा डिपॉझिट जप्त होत होते. प्रादेशिक पक्ष म्हणून युती केली. अकाली दल, ममता बॅनर्जी यांच्यासोबत युती केली. अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन केले. काही करा पण भगवा उतरू देऊ नका, असं सांगितलं आहे. पण आता भगव्याचं रंग फुसट झालं आहे. हे नव हिंदूत्वावादी झाले आहे. हे हिंदुत्वाचा वापर करत आहे. स्वत: च्या स्वार्थासाठी हिंदूत्वाचा वापर करत आहे. सत्ता पाहिजे म्हणून हिंदुत्त्वाशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मेहबूब मुफ्ती यांच्याशी युती, सत्ता पाहिजे म्हणून संघ मुक्त भारत करू म्हणवणाऱ्या नीतीश कुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटावे म्हणणारे चंद्राबाबू यांच्यासोबत युती केली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार घणाघात केला.

बाबरी पाडल्यानंतर देशात शिवसेनेची अशी लाट आली होती की, तेव्हाच सीमोल्लंघन केलं असतं तर शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मोठी नेते उतरत नाहीत, याबद्दल त्यांनी यावेळी कानउघाडणीही केली.

‘मी पुन्हा पुन्हा सांगतो, मध्यंतरी ते अमित शहा पुण्यात येऊन गेले. एकट्याने लढण्याचे त्यांनी आवाहन केले. दसऱ्या मेळाव्यातच आम्ही आवाहन स्विकारलं होतं. आम्ही एकट्याने लढू विरासारखे लढू पण ही लढाई करत असताना तुम्ही तुमचे अधिकार वापरायचे नाही, आम्ही आमचे अधिकार वापरणार नाही. कार्यकर्ते-कार्यकर्ते म्हणून आणि पक्ष म्हणून लढा, मग बघू कोण सरस आहे, ते पाहून घेऊ. पण आव्हानं द्यायची आणि ईडीची पिडा लावायची, याला काही अर्थ नाही, याला शौर्य म्हटले जात नाही, बाळासाहेबांनी काय उत्तर दिले असते हे सर्वांना माहिती आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.अमित शहा म्हणाले एकट्याने लढा आमची एकट्याने लढण्याची तयारी. आव्हान देऊन ईडी वगैरे ससेमिरा लावायचा. पुढे जात असताना भाजप वागले. तेव्हा यांचे डिपाॅझिट जप्त व्हायचे. समता ममता सगळ्यांना समवेत भाजपने युती केली. अटलजींना शिवसेनेचे सहकार्य. सोयीप्रमणे कश्मिरात, संघमुक्त भारत म्हणा नितिश कुमार सोबत युती. मतांसाठी गोवंश बंदी दूर केली. मर्दासारखी उघडपणे शिवतीर्थावर काँग्रेस सोबत युती, सरकार पाडून आमदार फोडून तुम्ही सरकार स्थापन केले. असले हिंदुत्व आमचे नाही.’असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

“लढ्यात आपण एकमेव पक्ष. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा. बाबरी पाडली तेव्हा सगळे पळाले नवहिंदू सगळे भंपक नव्या पिढीला हे माहिती व्हावे म्हणून पुनरूच्चार. आपण महाराष्ट्रात राहिलो तेव्हा कदाचित आपण दिल्लीत आलो असतो. मोदींच्या, शहांच्या अर्ज भरण्यास गेलो. मनापासून तुमचा प्रचार केला. आज एनडीए राहिली नाही जुने ते सर्व गेले. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला नाही. बलवान हिंदुत्व हवय.
आज आपण गप्प बसलो तर गुलामगिरी येईल. आणीबाणी सदृश परिस्थिती मोडायची असेल तर शिवसैनिकांनी समोर यायला हवे.”असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.  

तसंच, त्या काळजी वाहू विरोधकांना मी शिवसेनेच्या भगव्याचे तेज दाखवणार आहे. भाजपला आम्ही पोसलं होतं. मागेही मी म्हणालो होतो की, युतीत 25 वर्ष सडली. कारण आता यांना राजकारणाचे गजकरण लागले आहे. राजकारणासाठी ते काही ही खाजवत आहे’ अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

“ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी”

“मी तरी कुठं फिरलो? यावेळचा भाग वेगळा होता, पण इतर वेळा मी पण या निवडणुकीत फिरलो नाही हे टाळायला हवे. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी. लढाई निर्णायक निष्ठेने लढायची असते. सहकारात आपण काय करतो आहे? गावात संस्था निर्माण कराव्यात, पण नियमबाह्य काहीही करू नये. सत्तेचा दूरगामी उपयोग व्हावा. संधीचे सोने करा,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय.

“युतीमध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायत जागा जिंकल्या”

उद्धव ठाकरे म्हणाले, “”शिवसेना इतर राज्यात सुध्दा निवडणुका लढवते आहे. हरलो तरी पराजयाने खचून जायचे नाही. विजयाचा उन्माद नको. कधी तरी जिंकणारच. नगरपंचायती सर्व जागा लढवल्या नव्हत्या. आज चार क्रमांकावर असलो, तरी आम्ही जागा किती लढवल्या? अगदी युतीमध्ये जिंकल्या त्यापेक्षा आज अधिक नगरपंचायती जागा निवडून आल्या. आपण या निवडणुका गांभीर्याने घ्यायला हव्यात.”