औरंगाबाद जिल्हा दूध संघ निवडणुकीत एकता सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय

जफर ए.खान

औरंगाबाद,२३ जानेवारी :- औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत दूध संघाचे विद्यमान चेअरमन तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय एकता सहकार विकास पॅनेलचा 250 मतांच्या फरकाने दणदणीत विजय झाला.

वैजापूर मतदारसंघातून विद्यमान संचालक कचरू पाटील डिके हे 286 मते घेऊन पाचव्यांदा निवडून आले.दूध संघाच्या या निवडणुकीत एकता सहकारी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळविला.  राष्ट्रमाता जिजाऊ दूध संघ बचाव पॅनलचा धुव्वा उडाला या पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

Displaying IMG-20220123-WA0108.jpg

जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले होते, मात्र दूध संघाचे विद्यमान चेअरमन आ.हरिभाऊ बागडे (औरंगाबाद) व संचालक राजेंद्र पाथरीकर (फुलंब्री), पुंडलिक काजे (कन्नड) कचरू पाटील डिके (वैजापूर), गोकुळसिग राजपूत (कन्नड) व शीला कोडगे (औरंगाबाद) यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागली.

संचालकांच्या 14 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या उर्वरित 7 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.आ.हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे- अब्दुल सत्तार, आ.अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील एकता सहकार विकास पॅनल व पडद्यामागील नेत्यांचे राष्ट्रमाता जिजाऊ दूध संघ बचाव पॅनल यांच्यात लढत झाली. निवडणूकएकतर्फी होऊन सर्वपक्षीय एकता सहकार विकास पॅनलचा 250 मतांच्या फरकाने दणदणीत विजय झाला तर दूध संघ बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले.

दूध संघाचे विद्यमान चेअरमन आ.हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील एकता सहकार पॅनेलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे- अब्दुल सत्तार, आ.अंबादास दानवे,माजी आ.कल्याण काळे, आ.रमेश पाटील बोरणारे, आ.प्रशांत बंब, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, रमेश पाटील डोणगांवकर यांनी प्रयत्न केले.

वैजापूर मतदार संघातील एकता सहकार विकास पॅनलचे उमेदवार कचरू पाटील डिके यांना निवडून आणण्यासाठी माजी नगराध्यक्ष साबेर खान व भाजपचे डॉ.दिनेश परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले. कचरू पाटील डिके यांनी 342 पैकी 286 मते घेऊन विरोधी पनेलचे नंदकिशोर जाधव यांचा दणदणीत पराभव केला. नंदकिशोर जाधव यांना केवळ 58 मते मिळाली.
उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे —      
हरिभाऊ बागडे —-  274     

सुरेश पठाडे —    65     

राजपूत गोकुळसिंग- 269   

चव्हाण सुरेश —   36   

बोरसे संदीप ——-   330   

पाथरीकर राजेंद्र – 14   

डिके कचरू मोहन – 286   

जाधव नंदकिशोर- 58 

कोडगे शीलाबाई — 273     

गीते शारदा —–    25   

अलका पाटील ——283   

सोनवणे रुखमण — 63   

काजे पुंडलिकराव – 250     

ताठे मारोती ——- 88