नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली ,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे; 

Image

“सर्व देशबांधवांना पराक्रम दिनानिमित्त अनेक शुभेच्छा ! नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त माझी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली ! मी नेताजींच्या चरणांना वंदन करतो. देशासाठी त्यांनी दिलेल्या अविस्मरणीय योगदानाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.