सावधान औरंगाबादकरांनो: पुन्हा हजारांवर कोरोना रुग्ण

औरंगाबाद,२२ जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात आज 481 जणांना (मनपा 346, ग्रामीण 135) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 49 हजार 405 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 236 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 60 हजार 177 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 673 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण सात हजार 99 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (790) उल्कानगरी 3, घाटी परिसर 1, मयूर पार्क 1, पवन नगर 1, पदमपुरा 1, देवा नगर 3, पडेगाव 1, पैठण रोड 2, स्नेह नगर 2, समर्थ नगर 3, इटखेडा 2, प्रताप नगर 2, स्टेशन रोड 1, सिल्क मिल कॉलनी 1, शिल्प नगर 1, सिटी चौक 1, भावसिंगपुरा 1, समता नगर 1, शक्ती नगर 1, आदित्य नगर 1, सिडको एन दोन 1, ज्योती नगर 1, पैठण गेट 1, वेदांत नगर 2, बन्सीलाल नगर 1, सातारा परिसर 4, नक्षत्रवाडी 1, दशमेश नगर 1, शिवाजी नगर 1, उस्मानपुरा 1, म्हसोबा नगर 1, नागेश्वरवाडी 1, चेतना नगर 1, राजेश नगर 1, शांतिनिकेतन कॉलनी 1, म्हाडा कॉलनी 1, आकाशवाणी परिसर 1, सुधाकर नगर 1, नवीन उस्मानपुरा 1, क्रांती चौक 1, जालन नगर 1, खडकेश्वर 1, छत्रपती नगर 1, छावणी 2, नक्षत्रवाडी 1, गारखेडा 5, चिकलठाणा 1, मुकुंदवाडी 1, न्यू हनुमान नगर 2, शिवाजी नगर 1, गजानन कॉलनी 1, उत्तम नगर 1, अन्य 718

ग्रामीण (446) औरंगाबाद 98, फुलंब्री 29, गंगापूर 72, कन्नड 47, खुलताबाद 41, सिल्लोड 40, वैजापूर 61, पैठण 55, सोयगाव 3

मृत्यू (02)

घाटी (01) 1. 69 पुरुष, सराफा श्रीमंत गल्ली, औरंगाबाद

खासगी (01) 1. 60,पुरुष, देवगिरी कॉलनी, औरंगाबाद