औरंगाबाद स्मार्ट शहर बस रविवारपासून धावणार ७७ दिवसानंतर

शहर बसची कमान आता माजी सैनिकांच्या हातात

औरंगाबाद,२२ जानेवारी /प्रतिनिधी :- औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी स्मार्ट शहर बस सेवेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दि. 23 जानेवारी 2022 पासून शहर बससेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ह्यावेळी अनुभवी माजी सैनिक चालक आणि वाहक ह्यांचाद्वारे सेवेचा संचालन होईल.

May be an image of one or more people, people sitting and bus

स्मार्ट शहर बस ही ए. एस. सी. डी. सी. एल. औरंगाबाद आणि रा. प. महामंडळात झालेल्या करारानुसार रा. प. महामंडळाच्या चालक आणि वाहक यांच्यामार्फत चालविण्यात येत आहे पण मागील 77 दिवसांपासून चालक आणि वाहक कामावर हजर नसल्यामुळे स्मार्ट शहर बस वाहतूक बंद आहे.

नागरिकांना बस सेवेचा लाभ व्हावा म्हणून स्मार्ट शहर बस सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त व प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ने एक महत्वाचा निर्णय घेतला. ह्या निर्णयानुसार करार पध्दतीने माजी सैनिकांच्या 15 वर्षांच्या चालकांचा अनुभव बघता त्यांची नेमणूक चालक आणि वाहक म्हणून करण्यात येत आहे आणि त्यामुळे 11 बसेस दोन पाळीत बससेवा पुरविणार आहे.

Image

श्री पाण्डेय म्हणाले की ह्या निर्णयामुळे नागरिकांना देशसेवेचा गौरव प्राप्त असलेल्या अनुभवी सैनिकांचे अनुशासन व कार्यक्षमतेचा लाभ होईल. येत्या काळात ह्या सेवेचा विस्तार कसा होईल ह्यावर कार्य सुरू आहे, अशे ते म्हणाले.

मागच्या काही महिन्यात शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उप व्यवस्थापक मुकुल देव आणि सिध्दार्थ बनसोड ह्या देखरेखीखाली ह्या 56 चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले.

पहिल्या टप्यात खालील 5 मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात येत आहे.

▪ मार्ग क्र. 4
सिडको ते रेल्वे स्टेशन
मार्गे – टीव्ही सेंटर

▪️ मार्ग क्र. 5
औरंगपुरा ते रांजणगाव
मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक
▪️ मार्ग क्र. 12
सिडको ते घाणेगाव
मार्गे – रांजणगाव, मायलन
▪️ मार्ग क्र. 13
सिडको ते जोगेश्वरी
मार्गे – रांजणगाव

▪️ मार्ग क्र. 19
चिकलठाणा ते रांजणगाव
मार्गे – सिडको, महावीर चौक, मोरे चौक

प्रवाश्यांनी कोविडच्या सर्व नियमांचा अवलंब करून बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाश्यांनी घेण्याचे आवाहन स्मार्ट शहर बस विभाग यांच्या कडून करण्यात येत आहे.

● प्रवासावेळी मास्क आणि सेनिटायझर वापरणे, कोविड प्रतिबंधक दोन लस घेऊनच प्रवास करणे व शासकीय आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी 7507953828 नंबरवर व्हाट्सएपच्या साहाय्याने संपर्क करा