जालना भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख करीम लिडर

जालना ,२२ जानेवारी /प्रतिनिधी :-जालना भारतीय जनता पक्ष  अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गांधीनगर परिसरातील जेष्ठ समाजसेवक तथा माजी नगरसेवक शेख करीम लिडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रदेश सचिव इद्रिस मुलतानी, अल्पसंख्याक मोर्चा चे सरचिटणीस अतिक खान यांच्या हस्ते शेख करीम लिडर यांना नियुक्ती पञ देण्यात आले. या वेळी भाजपा द. भा. आघाडी चे शहराध्यक्ष गणेश जल्लेवार, माजी नगरसेविका सखुबाई पनबिसरे, गुलाब पनबिसरे यांची उपस्थिती होती. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटन बळकट करावे असे त्यांना दिलेल्या नियुक्ती पञात प्रदेश सरचिटणीस अतिक खान व जिल्हाध्यक्ष मुसा सौदागर यांनी नमूद केले आहे.