लैंगिक छळापासून बाधित महिला सदर कायद्यांतर्गत घटीत समितीकडे तक्राराची नोंद करु शकते-अश्विनी धन्नावत

जालना ,२२ जानेवारी /प्रतिनिधी :-महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ प्रतिबंध, बंदी आणि निवारण कायदा, २०१३ हा कायदा संपूर्ण भारतात केंद्र सरकाराने लागु केला आहे. ज्यामुळे कामाच्या ठिकाणी कामास असलेली किंवा नसलेली, किंवा एखाद्या राहत्या घरात व कामाला असलेली, कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळापासून बाधित महिला सदर कायद्यांतर्गत घटीत समितीकडे तक्राराची नोंद करु शकते अशी माहीती विधिज्ञ अश्विनी धन्नावत यांनी दिली
एम्पलॉयर तथा मालकांना जिथे १० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे व त्यामध्ये महिला कर्मचारी आहेत, तेथे सदर समिती गठीत करणे अनिवार्य आहे. तसेच जिथे सदर कर्मचारी संख्या १० पेक्षा कमी असेल त्याठिकाणी जर महिलांवर काही लैंगिक अत्याचार झाले तर ती महिला जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीकडे तक्रार नोंद करु शकते.मालकांचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावे, जेणे करुन ती कोणत्याही दबावाखाली न येता कार्य करु शकेल व तिच्यावर काही अत्याचार झाले तर ती, त्याबाबत तक्रार करु शकेल असे असे वातावरण देणे मालकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ज्या प्रतिष्ठानाने जिथे १० पेक्षा जास्त कर्मचारी आहे व त्यामध्ये महिला कर्मचारी असेल त्यांनी त्वरीत अंतर्गत तक्रार कमिटी स्थापित करावी व इतर ठिकाणी जेथे कर्मचारी संख्या कमी असेल तेथे जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार कमिटीकडे तक्रार करणे बाबत त्यांच्या पत्ता व अध्यक्ष तथा सदस्यांची माहिती दर्शविणारा मार्गदर्शन तक्ता लावण्यात यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय स्थानीक तक्रार कमिटीच्या अध्यक्षा अॅड. अश्विनी महेश धन्नावत यांनी केले आहे.तसेच इनरव्हिल क्लब ऑफ, जालना होराईजनच्या अध्यक्षा नेत्रा भक्कड यांच्या सहकार्याने सुध्दा या कायद्याच्या जनजागृती संदर्भात कार्यक्रम घेतले जाणार आहेत असे त्या म्हणाल्या.