सुभानपुर येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा


जालना ,२२ जानेवारी /प्रतिनिधी :- सुभानपुर ता.भोकरदन येथे 67 लक्ष 50 हजार रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते झाला.

Displaying subhanpur ph 1.jpg

भोकरदन तालुक्यातील सुभानपुर येथे  जलजिवन मिशन अंतर्गंत जलकुंभ व पाईपलाईनसाठी 25 लक्ष, ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 12 लक्ष, सांस्कृतीक सभागृह बांधकामासाठी 7 लक्ष, सिमेंट नाला बांधकामासाठी 10 लक्ष, तीन हायमास्ट लाईट बसविणे 3लक्ष, घनकचरा व्यवस्थापनासाठी 4.5 लक्ष, समाज मंदीरा समोर सिमेंट गट्टु बसविण्यासाठी 1 लक्ष, बंदीस्त नाली बांधकामासाठी 2 लक्ष, पाणी पुरवठा विहीर दुरुस्तीसाठी 1 लक्ष, शाळेसाठी सोलार प्लॅन्ट बसविणे 1 लक्ष व पाईपलाईन दुरुस्तीसाठी 1 लक्ष रुपये असे एकुण 67 लक्ष 50 हजार रुपये किंमतीच्या कामांचा उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या सौ.आशाताई पांडे, पं.स.सभापती विनोंद गावंडे, सिध्देश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, गणेश पा. ठाले, पं.सदस्य ऋषिकेश पगारे, संतोष वाघ, राजकुमार राजपुत, सुनिल सरोदे, राम दुधे, चरणसिंग मेहर, किशोर जाधव  उपस्थित होते.

Displaying subhanpur ph 3.jpg


यावेळी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे म्हणाले की, गावातील पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरुपी प्रश्न सुटावा यासाठी जलकुंभ व ग्रामपंचयत इमारत बांधकामसाठीची आग्रही मागणी लक्षात घेवुन जलजिवन मिशन अंतर्गंत आपल्या गावाची निवड करण्यात आली असुन जलकुंभ व गावंअंतर्गंत पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असुन त्यासाठी 12 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदर दोन्ही मागण्याच्या आज पूर्ण होत असतांना मनस्वी आनंद होत आहे. पुढे ते म्हणाले की, तालुक्याचा प्रतिनिधी या नात्याने गावाच्या सर्वांगिण विकासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडु देणार नसल्याची ग्वाही  त्यांनी यावेळी दिली.
 सुभानपुरच्या सरपंच सोनाबाई गाढे, काकासाहेब काकडे, केशवराव कोल्हे, योगेश गाढे, मा.सरपंच गंगाधर पगारे, त.मु.अध्यक्ष पुरुषोत्तम सुसर, पुंडलिक गाढे, दादाराव कोल्हे, समाधान गाढे, उत्तमराव गाढे, कृष्णा गाढे, गणेश गाढे, सर्जेराव खरात, ग्रासेवक झोरे, कोंडीबा गाढे,  संजय डकले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांची मोठया संख्यने उपस्थिती होते