केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार, दि.21 जानेवारी, 2022 रोजी सायंकाळी 05.30 वा. मुंबई येथून विमानाने औरंगाबादकडे प्रयाण. 06.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 07.00 वा. श्री.भरत यादव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : सुभाष पेठ, गुरूवार बाजार, छावणी औरंगाबाद.

शनिवार, दि.22 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 09.00 ते रात्री 10.00 औरंगाबाद शहरात स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.

रविवार, दि.23 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 10.00 वा. राज्यस्तरीय पैलवान स्पर्धा येथे उपस्थिती. स्थळ : मौलाना आझाद रिसर्च सेंटर, हडको औरंगाबाद. 11.30 वा. डेंटल स्कील इन्स्टिट्युट यांच्या वतीने आयोजित कौशल्य विकास कोर्स प्रमाणपत्र वितरण सोहळा. स्थळ : हॉटेल विट्स, वेदांत नगर, औरंगाबाद. सायंकाळी 06.00 वा. केकत जळगाव, ता.पैठण येथे सत्कार समारंभास उपस्थिती.

सोमवार, दि.24 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 09.00 वा. मकरंदपूर ता.कन्नड येथील ड्रेनेज लाईन कामाचे लोकार्पण व ई-श्रम कार्ड आणि हेल्थ कार्डची नोंदणी. 10.00 वा. उपळा, ता.कन्नड येथे वॉटर फिल्टर प्लांटचे भूमिपूजन. 10.30 वा. आंबा, ता.कन्नड येथे शाळा नुतनीकरण कामांचे लोकार्पण. 11.00 वा. वडनेरा ता.कन्नड, येथे सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. सितानाईक तांडा, ता.कन्नड येथे सत्कार समारंभास उपस्थिती. 01.00 वा. जेहुर, ता.कन्नड येथे सुभाष काळे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन. 02.00 वा. रोहिला, ता.कन्नड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. 02.30 वा. हसनखेडा, ता.कन्नड येथे विविध विकास कामांचे लोकार्पण. 03.30 वा. मनुर, ता.वैजापूर येथे क्रिडा स्पर्धामध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ. 04.30 वा. सोयीनुसार औरंगाबाद निवासस्थानाकडे प्रयाण.