छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद हॉस्पिटल आणि रुग्णालयाला NABH ची अधिस्वीकृती

औरंगाबाद,२० जानेवारी / प्रतिनिधी :- कांचनवाडी, औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (CSMSS) संचलित आयुर्वेद हॉस्पिटल आणि रुग्णालयाला अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी “नॅशनल अँक्रीडीटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर” (NABH) ची अधिस्वीकृती मिळाली आहे. 

Displaying NABH_page-0001.jpg

हॉस्पिटलच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे व अध्यक्ष रणजीत मुळे यांनी दिली.        रूग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक निदान व किफायतशीर दरात योग्य उपचार यामुळे CSMSS आयुर्वेद हॉस्पिटल आणि रुग्णालयाने वेगळी ओळख निर्माण केल्याचे श्री मुळे यांनी सांगितले. ‘एनएबीएच’ अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह रुग्णसेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे, या पुढील काळात रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ  श्रीकांत देशमुख यांनी दिली.
 आयुर्वेद हॉस्पिटलच्या ‘एनएबीएच’ अधिस्वीकृतीमुळे विश्वासार्हतेत अधिक वाढ होईल व त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होईल. आमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे यश असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. ‘एनएबीएच’ अधिस्वीकृतीमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘एनएबीएच’च्या कार्यपद्धतीची माहिती देताना रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळवून देणे, रुग्णांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, सर्व प्रकारच्या सरकारी, निमसरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, यासाठी “रुग्णालये व आरोग्यसेवेसाठीचे राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ (एनएबीएच) कार्यरत असल्याचे सांगितले. रुग्णालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, सेवा, उपचार या सर्व बाबी लक्षात घेऊनच अशा प्रकारचे मान्यता ‘एनएबीएच’कडून दिली जाते. ‘एनएबीएच’ अधिस्वीकृतीसाठी मिळवण्याच्या प्रक्रियेत संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. जयश्री देशमुख आणि सर्व डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी या सर्व मान्यवरांनी योगदान घेतलेले आहे.