दुकानांवरील पाट्या मराठीत:अंमलबजावणी करण्यासाठी जालना प्रशासनाने पाऊले उचलावीत -युवा सेनेची मागणी

जालना ,१९ जानेवारी /प्रतिनिधी :-मातृभाषा असलेल्या महाराष्ट्रात सर्व छोट्या – मोठ्या दुकानांवरील पाट्या मराठी  भाषेत ठेवाव्यात असा मातृभाषेच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने  नुकताच घेतला असून  जालना शहर व जिल्ह्यात या निर्णयाची  प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलावीत. अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले यांनी केली आहे. 

Displaying 1642503766247.jpg
अंकुश पाचफुले


या संदर्भात प्रसिद्धीस  दिलेल्या लेखी निवेदनात अंकुश पाचफुले यांनी म्हटले आहे, दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत  ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 ‘ मध्ये सुधारणा करण्यात आली ज्यामूळे दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने यांना नियमातून आता पळवाट काढता येणार नाही. असे नमूद करत ज्या दुकानांवर मराठी पाट्या नसतील अशा दुकानदारांविरूध्द 2017 मधील कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मोहीम प्रशासनाने राबवावी अशी मागणी अंकुश पाचफुले यांनी केली. दरम्यान राज्याचे भाषा मंञी सुभाष देसाई यांनी राज्यात  मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्याचे निर्देश दिले असून त्या अनुषंगाने मातृभाषा जतन, संवर्धनासाठी प्रशासनाने उपक्रम राबवावेत. अशी आग्रही मागणी अंकुश पाचफुले यांनी केली आहे.