स्वातंत्र्यवीर सावरकर दिनदर्शिकाचे विमोचन

जालना ,१९ जानेवारी /प्रतिनिधी :- सावरकरांचे विचार घराघरात-मनामनात पोहोचविण्याच्या हेतूने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, जालना निर्मित “स्वा. सावरकर दिनदर्शिका-२०२२” चे विमोचन जेष्ठ उद्योजक  रमेशभाई पटेल व भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  सुनील पहेलवान खरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात  करण्यात आले. 

भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा भोगून आपल्या संपूर्ण कुटुंबाची आहुती देणारे, मराठी भाषेला शेकडो मराठी शब्द देणारे, हजारो पानांचे मराठी साहित्य रचणारे व स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव समूळ नष्ट करणारे, भाषा शुद्धीकार यासह अजरामर गीत, काव्य रचणारे,अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगून मातृभूमीला स्वातंत्र्य देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे  कार्य व त्यांचे स्मरण सर्वांनाच व्हावे म्हणून ही कालदर्शिका असल्याचे यावेळेस  रमेशभाई पटेल यांनी सांगितले  सुनील खरे, अमित कुलकर्णी, राहुल यादव, सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, संजय देशपांडे, संकेत मोहिदे, अमोल पाठक, प्रथमेश कुंटे, जय चौंडीये, बजरंग दलचे अर्जुन डहाळे, गणेश रेंगे  उपस्थित होते