सावधान ! रुग्ण संख्येत होत आहे मोठी वाढ

औरंगाबाद ,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक 

औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. औरंगाबाद ,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत झालेली वाढ चिंताजनक आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 55 हजार 606 झाली आहे.

लातूर जिल्ह्यात ५१० नवे कोरोना पॉझिटिव्ह

लातूर:- जिल्ह्यात आज तब्बल ५१० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले , तर २०६ रुग्णांनी केली कोरोनावर मात केली. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या गेली ०३ हजारच्या वर गेली आहे . गेल्या २४ तासात कुणाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

नांदेड जिल्ह्यात 451 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 566 अहवालापैकी 451 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 374 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 655 एवढी झाली असून यातील 88 हजार 900 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 100 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 229, नांदेड ग्रामीण 34, भोकर 2, देगलूर 7, धर्माबाद 1, हिमायतनगर 1, हदगाव 2, किनवट 1, लोहा 11, मुदखेड 1, मुखेड 11, नायगाव 8, उमरी 18, बिलोली 4, हिंगोली 6, परभणी 15, औरंगाबाद 2, दिल्ली 1, हैदराबाद 8, वाशीम 1, लातूर 2, अमरावती 2, निझामबाद 2, कोल्हापूर 1, जालना 3, नागपूर 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 32, नांदेड ग्रामीण 2, अर्धापूर 2, बिलोली 19, धर्माबाद 6, हदगाव 2, मुखेड 10, नायगाव 4 असे एकूण 451 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 292, खाजगी रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 17 असे एकुण 316 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

आज 3 हजार 100 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 610, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 433, खाजगी रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 3 हजार 100 व्यक्ती उपचार घेत आहेत.

औरंगाबाद शहरात ७०१ रुग्ण 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 244 जणांना (मनपा 200, ग्रामीण 44) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 47 हजार 451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 856 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 55 हजार 606 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 662 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण चार हजार 493 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (701)घाटी परिसर 6, जुबली पार्क 1, पुंडलिक नगर 2, एमजीएम हॉस्पिटल 4, एन-6 येथे 1, जाधववाडी 1, उसमानपुरा 8, छावणी 1, गांधी नगर 1, ऑरेंज सिटी 1, सातारा परिसर 8, दशमेश नगर 1, बीड बायपास 6, देवळाई परिसर 1, सिग्मा हॉस्पिटल 3, सिंधी कॉलनी 2, एन -1 येथे 3, एन -4 येथे 8, बजाज हॉस्पिटल परिसर 1, मयूर पार्क 1, पवन नगर 1, गारखेडा परिसर 6, उच्च न्यायालय परिसर 2, संदेश नगर 1, एमआयटी कॉलेज 2, रेणूका नगर 3, मयूरबन कॉलनी 1, देशमुख नगर 1, जवाहर कॉलनी 1, शिवाजी नगर 1, शहानूरवाडी 2, गादिया विहार 1, कांचनवाडी 1, हेडगेवार हॉस्पिटल परिसर 1, उल्कानगरी 1, जयभवानी नगर 4, विष्णू नगर 1, जटवाडा रोड 1, एन -3 येथे 5, गजानन नगर 1, एन-5 येथे 1, अंबिका नगर 1, प्रपात नगर 1, एन-2 येथे 10, एन-12 येथे 1, चिकलठाणा 1, राम नगर 1, म्हाडा कॉलनी 1, कासलीवाल परिसर 1, विठ्ठल नगर 1, हनुमान नगर 1, ज्योती नगर 1, टीव्ही सेंटर 1, संजय नगर 2, अन्य (580)

ग्रामीण (155) औरंगाबाद 43, फुलंब्री 10, गंगापूर 35, कन्नड 11, खुलताबाद 02, सिल्लोड 06, वैजापूर 26, पैठण 20, सोयगाव 2

जालना जिल्ह्यात 99 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात- जालना शहर –जालना शहर -51, आंकार देऊळगांव -1, पिरपिंपळगांव -4,मंठा तालुक्यातील – मंठा शहर -1, परतुर तालुक्यातील- निरंक घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -8 , दहिगव्हाण -1, राजेगांव -1, मोहापुरी -1,अंबड तालुक्यातील – अंबड शहर -2, बरसवाडा -3, डोणगांव -3, चंदनपुरी खु -2, बदनापुर तालुक्यातील –बदनापुर शहर -3, शेलगांव -2, काजळा -1,देवगांव -1, हळदोला -1, धोपटेश्वर -1, जाफ्राबाद तालुक्यातील – तोंडोली -1,भोकरदन तालुक्यातील – नळणी बु. -04, पळसखेडा पिंपळे- 1, वालसावंगी -1 इतर जिल्ह्यातील- बुलढाणा -3, परभणी -1, बीड -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 77 तर अँटीजेन तपासणीद्वारे 22 असे एकुण 99 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 67300 असुन सध्या रुग्णालयात- 67 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14121 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1997 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-728120 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -99, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 63191 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 659874 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-1132 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535813