कोविड लसीकरण: लाडगाव येथे आढावा बैठक कोव्हॅक्सीन लस दोन दिवसात उपलब्ध होणार -गटणे

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्हा कोविड लसीकरणात मागे असल्याने व ग्रामीण भागात कोविड लसीकरणला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश गटणे व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी मंगळवारी वैजापूर तालुक्यातील लाडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा बैठक घेतली.

 या आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, जिल्हा परिषद सदस्य सदस्य पंकज ठोंबरे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा सुकाणू समिती सदस्य, वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, आरोग्य दूत, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या संयुक्त बैठकीत श्री .गटणे यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेत लसीकरण गती वाढविण्यासाठी साठी सर्वंकष प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “कम्युनिटी अकॅशन फॉर हेल्थ”;याअंतर्गत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. लाडगाव आरोग्य केंद्रांतर्गतव 37 गावे आहेत 47,523 चे लसीकरण असतांना पहिला डोस 36,175 नागरिकांनी तर दुसरा डोस 17331नागरिकांनी घेतला आहे अजून खूप नागरीक डोस विना आहेत त्यांच्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी नियोजन करून तात्काळ कोविड लस द्या असा आदेश त्यांनी संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी एमजीव्हीएसचे सचिव आप्पासाहेब उगले, अन्नपूर्णा ढोरे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत, बापू वाळके, राधाकृष्ण गुजर, नारायण भोपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ,गुरुनाथ इंदोरीकर, गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ,पी.एन.बडे, वैद्यकीय अधिकारी लाडगाव डॉ.वृषाली हजारी, ऋतूराज सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.याबैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.कोव्हक्सीन लस दोन दिवसांत उपलब्ध होईल असे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी यावेळी सांगितले.