ऑक्सफर्ड बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अफिया महिरीन,प्रतिक्षा पवार व अमन शेख यांना विजेतेपद

जालना,१८ जानेवारी / प्रतिनिधी :-  शहरातील ऑक्सफर्ड इंग्लिश हायस्कूल जालना येथे मंगळवार रोजी बॅडमिंटन स्पर्धा शाळे अंतर्गत घेण्यात आली. या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी ते आठवी एकूण 20 खेळाडूंनी  सहभाग नोंदविला. यामध्ये एकूण चार गट करण्यात आले.

Displaying IMG-20220118-WA0134.jpg


    त्यामध्ये गट अ.ब.क.अनुक्रमे अ मधून प्रथम पदक अफिया महिरीन, व्दितीय शर्वरी यदमराळे, तृतीय तृप्ती नाटकर यांनी तर गट ब मधून प्रथम प्रतिक्षा पवार, द्वितीय संस्कृती खंदारे, तृतीय नक्षत्रा चेके यांनी तर गट क मधून प्रथम अमन शेख, द्वितीय दिव्यानी रत्नपारखे, तृतीय दर्शना हाडे यांनी घवघवीत यश संपादीत केले.  
यश संपादीत केलेल्या खेळाडूने खेळामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल ऑक्सफोर्ड इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बुशरा सय्यद, क्रीडा प्रमुख विनोद चोबे यांच्या हस्ते खेळाडूंना पदक देण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका खमर सुलताना मॅडम, मुख्याध्यापक जिशान अल्ली उपस्थित होते.
         क्रीडा शिक्षक संतोष आडे, सुमेर इनामदार, यांनी परिश्रम घेतले. यावेळी सुफियान ,अजम शेख, प्रकाश इंगळे ,संदीप राठोड, याबेश कमाने, जावेद शेख, मुळे , राजाराम कापडे इत्यादी ने खेळाडूंचे अभिनंदन केले.