राज्यातील आघाडी सरकार सर्वसामान्यांचे हिताचे – आ.अंबादास दानवे

शिवसवांद मोहिमेअंतर्गत आ. अंबादास दानवे यांचा वैजापूर तालुक्यात दौरा 

वैजापूर ,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागील दोन वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. 97 टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. अतिवृष्टीमध्ये त्यांच्या मदतीला धावले. पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातुन गावागावात रस्ते झाले व महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणणारे हे देशातील दुसरे राज्य आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे संपुर्ण जिल्ह्यात शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांनी रविवारी वैजापूर तालुक्यातील जातेगाव, पिंपरी (ता. गंगापूर), कापुसवाडगाव, डवाळा, वैजापूर शहर, भिंगी, जानेफळ या ठिकाणी भेट देऊन बैठका घेतल्या यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, जिल्हा बँकचे संचालक शिवसनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, लक्ष्मण सांगळे, संतोष काळवणे, कृष्णा पाटील डोणगावकर, उपनगराध्यक्ष सुभाष कानडे, अंकुश सुंब, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हा संघटक लता पगारे, तालुका संघटक वर्षा जाधव यांची उपस्थिती होती.

या  शिवसंवाद मोहिमेच्या निमित्ताने आमदार दानवे यांनी प्रत्येक शिवसैनिक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून राजकीय, सामाजिक परिस्थितीची माहिती कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांशी संपर्क करून अडीअडचणी जाणून घेत शक्य तेवढ्या अडचणी जागेवरच सोडवण्यास  आमदार दानवे यांनी प्राधान्य देत आहे.

या कार्यक्रमास शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, खुशालसिंग राजपूत, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, महेश बुणगे, बाळासाहेब जाधव, खलील मिस्तरी, सलीम वैजापूरी, भाऊसाहेब गलांडे, मनाजी मिसाळ, वसंत त्रिभुवन, डॉ.निलेश भाटिया यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तर कापूसवाडगाव या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमास सुनील कारभारी, परसराम मोईन, अक्षय साठे, शाखाप्रमुख अशोक रोहम, मारोती निगळ, सुनील थोरात, कृष्णा गवळी, अक्षय थोरात, दादासाहेब गवळी, वसंत मोरे, आयुब पठाण, वसंत थोरात, भाऊराव तेलंगे, शिवानी निगळ, सुनंदा गोरख, रुक्मिणी करमाळे आदींची उपस्थिती होती.