लसीकरण मोहिमेत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी बजावलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी केले कौतुक

नवी दिल्ली ,१६ जानेवारी / प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिवादन केले आहे. लसीकरण मोहिमेत  डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी बजावलेल्या  भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. भारताच्या लसीकरण कार्यक्रमामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे, असेही ते म्हणाले.

MyGovIndia च्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विटच्या मालिकेत म्हटले;

“आज लसीकरण मोहिमेला एक वर्ष झाले.

लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी अभिवादन  करतो.

आपल्या  लसीकरण कार्यक्रमाने कोविड-19 विरुद्धच्‍या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे. यामुळे जीव वाचले आहेत  आणि उपजीविका राखल्या गेल्या.

यात  आपले  डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांची भूमिका अनन्यसाधारण  आहे. जेव्हा आपण दुर्गम भागात लसीकरण करत असलेल्या लोकांची किंवा आपले आरोग्य कर्मचारी तेथे लस घेऊन जातात, ती  क्षणचित्रे  पाहतो तेव्हा आपले हृदय आणि मन अभिमानाने भरून येते.

महामारीविरुद्ध  लढण्याचा भारताचा दृष्टीकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील. आपल्या  नागरिकांना योग्य देखभाल  मिळावी यासाठी आम्ही आरोग्यविषयक  पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहोत.

चला, आपण सर्व कोविड-19 संबंधित प्रोटोकॉलचे  पालन करत राहू आणि महामारीवर मात करू.”