जिल्हा परिषद आरोग्य विभाग मार्फत 292532 लोकांची तपासणी

औरंगाबाद, दि. 07 :जिल्ह्यात ग्रामीण भागातील 55 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांची तपासणी नियमित करण्यात येत असून, 5 जुलै 2020 पर्यंत जिल्ह्यात एकूण 292532 लोकांची तपासणी करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे .ग्रामस्थांनी कोरोना या संसर्गजन्य रोगाबाबत वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे आहे. तोंडाला नियमित मास्क अथवा चार पदरी कपडा वापरणे, वारंवार साबणाने हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सामाजिक वा शारीरिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, या महत्वाच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या.

            कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी सुरु आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गावामध्ये आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, सेविका यांच्यामार्फत कोरोना आजाराबाबत दररोज माहिती देण्यात येत असून, त्यापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रतिबंधक उपाय योजनाची खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये तसेच काही अडचणी उद्भवल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सोयगाव येथे  कडक अंमबजावणी :सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वच 46 ग्रामपंचायतीमध्ये  55 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक तसेच 15 वर्ष वयाखालील सर्व मुलांची ग्रामपंचायतकडून   26  ते  30 जून या कालावधीत आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यामार्फत घरोघरी जाऊन  तपासणी करण्यात आली. सर्व ग्रामपंचायतीना ऑक्सिमिटर व थर्मलगन खरेदी केले आहेत. वरील सर्व कामे केलीत की नाही याकरिता प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये क्षेत्रीय अधिकारी भेटी देऊन पाहणी करण्यात आली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय योजनाची खबरदारी घेण्यात येत असून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी करून विलगीकरण करण्यात येत आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले

प्रशासनामार्फत कोरोनापासून  बचाव करण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रतिबंधक उपाय योजनाची खबरदारी घेण्यात येत असून जनतेने अफ़वांवर विश्वास ठेवू नये, तसेच काही अडचणी उद्भवल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी केले. 

       खुलताबाद तालुक्यातील ग्रामपंचायत गदाना येथे आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी ग्रामस्थासोबत सपत्नीक संवाद साधून प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.  यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे,पंचायत समितीचे सभापती गणेश आधाने, उपसभापती रेखा प्रकाश चव्हाण, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ ज्ञानोबा मोकाटे, सरपंच हौसाबाई वाहूळ, उपसरपंच द्वारकाबाई आधाने उपस्थित होते.यावेळी डॉ. गोंदावले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोना बाबत केलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, सेविका त्यांच्या सोबत चर्चा करून सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशान भूमीचीही त्यांनी पाहणी केली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *