जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह 60 अधिकारी,कर्मचाऱ्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस

जालना,१५ जानेवारी / प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस घेतला.

May be an image of 2 people and indoor

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बुस्टर डोसचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सर्व विभाग प्रमुखांसह त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील व दुसरा डोस घेऊन 39 आठवडे पूर्ण झाली असतील त्यांनी लसीचा बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करत लस देण्यासाठी नियोजन समितीच्या सभागृहात कॅम्पचे आयोजन करण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले होते.

May be an image of 2 people and people sitting

आज या कॅम्पमध्ये स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुस्टर डोस घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना डोस घेण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत बुस्टर लसीचा डोस घेतला. प्रशासकीय इमारतीमधील जवळपास 60 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस घेतला.